लॉकडाऊनमध्ये अडकलेले आपापल्या घरी जायला उतावीळ... पण अशी असेल प्रक्रिया

लॉकडाऊनमध्ये अडकलेले आपापल्या घरी जायला उतावीळ... पण अशी असेल प्रक्रिया

लॉकडाऊनमुळे महिनाभर महाराष्ट्रात अडकलेल्यांचा मार्ग सरकारने मोकळा केला असला, तरी ते सोपं नाही. कुठलीही रेल्वे वा बससेवा सुरू केलेली नाही. त्यामुळे घाई करू नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 30 एप्रिल: Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला आणि हजारो परप्रांतीय कामगार अडकले. त्यांना गावी परतायाची इच्छा आहे पण बस, रेल्वेसेवा बंद असल्याने ते जाऊ शकले नाहीत. राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आणि राज्याबाहेर कसं जाता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे.

अद्याप कुठलीही बससेवा वा रेल्वेसेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे कामगारांनी वा मजुरांनी घाई करून गर्दी करू नये. आहेत त्याच ठिकाणी थांबावं असं आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आपल्या राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीयांची प्रशासनातर्फे यादी केली जाईल आणि योजनाबद्ध पद्धतीनेच त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रक्रियेबद्दल खुलासा केला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सांगितलं आहे. तथापी स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये, तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

अडकलेल्यांना बसने घरी पाठवण्याच्या केंद्राच्या आदेशाला 7 राज्यांचा विरोध

कामगारांनी आहेत त्याच ठिकाणी राहावे. कुठल्याही अफवांना बळी पडू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, सद्यस्थितीत कुठल्याही बस अथवा रेल्वे सुरु करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कामगार व नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. तसेच घराबाहेर न पडता आहे. त्या ठिकाणीच सुरक्षित राहावे.

हेही वाचा.. तंबाखूने होऊ शकतो कोरोनावर उपचार! 'या' देशाने निकोटीनच्या विक्रीवर आणली बंदी

येथे करता येईल तक्रार...

जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतरनाची कार्यवाही सुरु केली जाईल. कामगारांच्या सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तक्रार असल्यास दुरध्वनी क्र.020-26111061 अथवा 020-26123371 अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com या इमेलवर तक्रारी स्विकारल्या जातील. याशिवाय तालुका नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.

हेही वाचा...परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारने अखेर उचलले पाऊल

First published: April 30, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या