पॅरिस, 30 एप्रिल : कोरोनाव्हायरसवर उपचार शोधण्यासाठी जगभरात वैज्ञानिक आणि संशोधक दिवस-रात्र काम करीत आहेत. दररोज एक नवीन अभ्यास आणि त्याचा अहवाल समोर येत आहे. कधी नवीन वॅक्सिनविषयी माहिती समोर येते तर कधी नव्या उपचाराबद्दल सांगितले जाते. मात्र अद्याप कोणताही नेमका उपचार शोधल्याचा दावा करण्यात आलेला नाही. यादरम्यान फ्रान्सच्या नव्या शोध समोर आला आहे. यानुसार स्मोकिंग करणाऱ्यांना संसर्गाची भीती असल्याचा दावा खोटा ठरविण्यात आला आहे.
फ्रान्सच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार जे लोक कोणत्याही स्वरुपातील तंबाखू (Tobacco) ते सेवन करतात आणि विषेशकरुन जे लोक स्मोकिंग करतात त्यांना कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी असते. हे संशोधन समोर आल्यानंतर फ्रान्स सरकारने (France Government) देशातील तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत.
आता क्लिनिकल ट्रायलची परवानगी मागितली
फ्रान्सच्या संशोधनकांनी आता क्लिनिकल ट्रायलच्या माध्यमातून याचा तपास करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी केलेल्या संशोधनात निकोटीनचा कोणत्याही स्वरुपात अवलंब केल्याने (त्याचा अवलंब न करणाऱ्यांच्या तुलनेत) संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. यानंतर फ्रान्स सरकारने तंबाखूच्या मागणीत वाढ होईल या भीतीने विक्रीवर निर्बंध आणले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशात निकोटीन गम आणि पॅचेजचा स्टॉक कमी होऊ नये यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. जर कोरोनावरील उपचारासाठी गरज लागल्यास पुरेसे तंबाखू उपलब्ध असेल. याशिवाय संशोधनाच्या आधारावर नागरिक मोठ्या संख्येने तंबाखू खरेदी करण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी हे नियम लावण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने कोणताही विक्रेता 11 मेपर्यंत एक महिन्याचा स्टॉकच्या बरोबरीने निकोटीन उत्पादनाची विक्री करू शकत नाही.
संबंधित-कोरोना योद्ध्यावर काळाचा घाला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सोडले प्राण