Home /News /maharashtra /

महाराष्ट्रासमोर या महिला सरपंचानं ठेवला आदर्श, वाचा या गावाला कोरोनापासून कसं दूर ठेवलं

महाराष्ट्रासमोर या महिला सरपंचानं ठेवला आदर्श, वाचा या गावाला कोरोनापासून कसं दूर ठेवलं

महिला सरपंचाच्या सतर्कतेमुळे टळलं गावावरचं मोठं संकट, नेमकं काय घडलं वाचा

  लातूर, 19 मे : लातूर, 19 मे : कोरोनाचं महासंकट जिल्ह्यावर असताना एका महिला सरपंचाच्या सतर्कतेमुळे एकावात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना महिला सरपंचानं सतर्कता दाखवून आपल्या गावाला कोरोनापासून दूर ठेवत नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. लातूरमधील कोराळी गावात महिला सरपंचामुळे गावावरचं मोठं संकट टळल्यानं ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. नेमकं काय घडलं होतं आणि महिला सरपंचाने काय केलं ज्यामुळे हे संकट टळलं वाचा. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कोराळी हे गाव आहे. इथलं एका कुटुंब काही वर्षांपासून मुंबईत राहात होतं. त्यांच्या एका नातेवाईकांचा 8 दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यासंदर्भातील माहिती या कुटुंबीयांनी लपवली होती तरीही ही माहिती ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि सरपंचा यांना कळली. हे कुटुंब मुंबईहून परवानगी न घेता शनिवारी गावात येऊन लपून बसले होते. हे वाचा-राज्यातील एकमेव ग्रीन झोन जिल्ह्यात कोरोना, प्रशासन झाले अलर्ट; आखला 'हा' प्लॅन महिला सरपंचांनी आपल्यासोबत काही सदस्य घेऊन या घराला टाळे ठोकले. त्यानंतर या 6 जणांना रुग्णालयात कोविड-19 ची चाणची करण्याचा सूचना देण्यात आल्या. कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे. घराबाहेर टाळं लावल्यानं हे कुटुंब गावातील कोणाच्या संपर्कात किंवा गावातील नागरिक कुटुंबीयांच्या संपर्कात येऊ शकले नाहीत. त्यामुळे गावात कोरोना पसरण्याचं मोठं संकट टळलं. महिला सरपंचानं वेळीच सतर्कता दाखवली नसती तर कोरोनाचा संसर्ग गावात पसरण्याची भीती होती. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण गाव सील करण्यात आलं असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे वाचा-औरंगाबादेत कोरोनाचा 35 वा बळी, रुग्णांची संख्या 1073 वर हे वाचा-राज्यात पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट, या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा संपादन- क्रांती कानेटकर

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

  पुढील बातम्या