औरंगाबाद, 19 मे : महाराष्ट्रात लॉकडाउन 4 ची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, तरीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आज कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृतांची संख्या 35 वर पोहोचली आहे.
शहरात मागील 30 दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलली असल्याचं समोर आलं आहे. 18 मे रोजी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आज शहरातील हिमायतनगर, हिमायतबाग येथील 65 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाला ताप आणि दमा होता. त्यामुळे या रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली.
हेही वाचा -राज्यातील एकमेव ग्रीन झोन जिल्ह्यात कोरोना, प्रशासन झाले अलर्ट; आखला 'हा' प्लॅन
सोमवारी 18 मे रोजी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. परंतु, काल उपचारादरम्यान या रुग्णाची प्रकृती खालावली. त्याला तातडीने व्हेंडिलेटवर ठेवण्यात होतं. परंतु, रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला. शहरात कोरोनामुळे मृतांचा आकडा आता 35 वर पोहोचला आहे.
आज 51 रुग्णांची वाढ
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 वर पोहोचली आहे. आज सकाळी शहरातील रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), जटवाडा रोड (1), हिमायत बाग (1), किराडपुरा (4), पुंडलिक नगर (1), मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), जयभीम नगर (1), संजय नगर (1), रहिम नगर (1), कैलास नगर (1), गादल नगर (1), सादात नगर, गल्ली नं. 6 (4), शिवनेरी कॉलनी (1), विधिया नगर, सेव्हन हिल (1), गल्ली नं. 25, बायजीपुरा (4), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (1), मकसूद कॉलनी (1), जाधववाडी (1), गल्ली नं. 23, बायजीपुरा (2), गल्ली नं. 3, बायजीपुरा (1), सातारा गाव (3), आदर्श कॉलनी, गारखेडा (3), गारखेडा परिसर (1), मित्र नगर (1), मिल कॉर्नर(1), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (1), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (1) अन्य (4) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (3) या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.