पिंपरी चिंचवड, 8 मे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad) ऑटो क्लस्टर कोविड सेंटर (Auto cluster covid center)मधील कर्मचारी रेमडेसिवीर इंजेक्शनचा बेकायदेशीररित्या काळाबाजारात विक्री (black marketing of remdesivir) करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या प्रकरणात ऑटो क्लस्टरमधील ब्रदर पदावर कार्यरत असणाऱ्या अजय बाबाराजे दराडे याला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना पिंपरी - चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली आहे.
ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमधील ब्रदर अजय बाबाराजे दराडे रेमडेसिवीर इंजेक्शन विकत असतांनाच एक्सक्लुझीव्ह व्हिडीओ (Exclusive Video) न्यूज 18 लोकमतच्या (News18 Lokmat) हाती लागला आहे. या व्हिडीओत अमोल दराडे हा त्याचे दोन सहकारी नितीन हरिददास गुंड आणि सागर काकासाहेब वाघमारे यांच्या सोबत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करताना दिसत आहे. पिंपरी - चिंचवड पोलिसांनी स्वतः बनावट ग्राहक बनून आरोपींकडून रेमडेसिवीर इंजेक्शन कस विकत घेता येते याच हे चित्रीकरण केलं आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) May 8, 2021
वाचा: महाराष्ट्र हादरला! कोरोनातून वाचले पण नव्या रूपात मृत्यूने गाठलं; Mucormycosis मुळे 8 बळी
धक्कादायक बाब म्हणजे ऑटो क्लस्टर कोविड सेंटर पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेला चालवायला दिलं आहे. याच संस्थेतील कर्मचारीच रेमडेसिवीर विकण्याच्या गोरख धंदा करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या आधी सुद्धा ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी ह्याच जम्बो कोविड सेंटरशी संलग्न असलेल्या चार डॉक्टरांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र एव्हढे गुन्हे दाखल होऊन सुद्धा जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करायला महापालिका आयुक्त राजेश पाटील का धजावत नाहीत या बाबद आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान कुणीही रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करत असल्यास नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा आपण आरोपींवर खंडणीचा गुन्हा दाखल करणार असं जाहीर अहवान पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केल आहे. बेकायदेशीर रित्या रेमडिसिव्हर विकणाऱ्याची 9134424242 वर माहिती कळवा आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.