मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

शरद पवारांच्या काटेवाडीतील शेतकरी झाले भयभीत, जाणून घ्या काय आहे कारण...

शरद पवारांच्या काटेवाडीतील शेतकरी झाले भयभीत, जाणून घ्या काय आहे कारण...

Mumbai: Nationalist Congress President (NCP) Sharad Pawar with party leader Ajit Pawar (L) during a meeting at NCP office, in Mumbai, Sunday, Nov. 3, 2019. (PTI Photo) (PTI11_3_2019_000241B)

Mumbai: Nationalist Congress President (NCP) Sharad Pawar with party leader Ajit Pawar (L) during a meeting at NCP office, in Mumbai, Sunday, Nov. 3, 2019. (PTI Photo) (PTI11_3_2019_000241B)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मूळ गावी म्हणजे काटेवाडी.

बारामती, 7 जून: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मूळ गावी म्हणजे काटेवाडी. बारामती तालुक्यातील काटेवाडीत अलिकडे बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

गेल्या तीन महिन्यात तीन बिबटे पकडण्यात आले आहेत. कोटवाटीतील शेतशिवारात आणखी बिबटे असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा..मोठी बातमी! कोरोनाने घेतला तरुण पत्रकाराचा बळी, हैदराबाद येथे सुरू होता उपचार

काटेवाडीत रविवारी एक बिबट्या पकडण्यात आला. या आधी दोन बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला यश आलं होतं. डिसेंबर 2019 पासून हे बिबटे या परिसरात वावरत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर या तीन बिबट्या व्यतीरिक्त आणखी या बिबट्याची पिल्ले असल्याचं शेतकरी सांगत आहेत. या बिबट्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

बारामती नजीक असलेल्या एका कंपनीमध्ये बिबट्या वावरत असणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच काटेवाडी-कन्हेरी जवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्याच्या कळपावरती बिबट्याने हल्ला करुन मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. बिबट्या बारामती शहरानजीक असल्यामुळे शहरासह तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिन्यात बिबट्याने काटेवाडी येथील एका शेतात कुत्र्याचा फडशा पाडला होता.

दरम्यान, काटेवाडीजवळील धनेवस्ती येथील विजय काटे यांच्या शेतात मेंढ्या चरत असताना एका बिबट्याने कळपावर हल्ला केला. एका मेंढीला बिबट्याने मानेला जबड्यात धरुन फरपटत नेली. यामुळे इतर मेंढ्या भांबावल्या. हा प्रकार लक्षात आल्याने काळे यांनी धाडसीपणाने बिबट्याचा पाठलाग केला. तोपर्यंत बिबट्याने तीन चार एकर क्षेत्रातुन मेंढी फरपटत नेली. मात्र, काळे यांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवत त्याच्यावर काठीने हल्ला केला. त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडत ऊस क्षेत्रामध्ये पळ काढला. काळे यांनी मोठ्या धाडसाने मेंढीचा जीव वाचवला, त्यानंतर याबद्दल वनविभागाला माहिती देण्यात आली.

हेही वाचा......तर तुमच्या घरात कचरा आणून टाकेन, शिवसेना नेत्यानं अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

वन विभागानं या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असून इतर उपाययोजनाही केल्या आहेत. मात्र, बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published:

Tags: Baramati