यवतमाळ, 8 एप्रिल: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात असलेल्या आठ जणांची कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे या पैकी सात जणांचे दिल्लीतील निझामुद्दीन येथील 'तबलिगी' कनेक्शन समोर आले आहे. तर एक रुग्ण दुसऱ्या राज्यातील आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे रुग्ण आढळलेल्या गुलमोहर कॉलनी, भोसा रोड, मेमन कॉलनी, परिसर पूर्ण पणे सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, पोलीस अधीक्षक एम.राज. कुमार यांनी या भागात भेट देऊन परिसराची पाहणी केली. परिसर निर्जंतुकिकरण करणे सुरू आहे.
हेही वाचा..हँडसम दिसण्यासाठी दाढी वाढवताय, CoronaVirus ला निमंत्रण देताय
सात रुग्णांचं तबलिगी कनेक्शन...
सात पैकी चार जण उत्तर प्रदेशचे, दोन पश्चिम बंगालचे तर एक दिल्लीचा आहे. हे सातही जण तबलिगी जमातशी निगडीत आहेत. तर पॉझेटिव्ह असलेला आठवा व्यक्ती या सात जणांच्या संपर्कात आला होता.
सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण 65 जण भरती आहेत. यापैकी 51 जणांचे रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले. 14 जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकाच्या घराशेजारील भाग कंटेनमेंट (प्रतिबंधित) करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या घरातील इतर कुटुंबीय, ते ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांनासुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 89 आहे.
हेही वाचा...लढा जिंकूच! ‘या’ राज्याने तयार केली Covid-19 किट, 55 मिनिटांत लागणार निकाल
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.