Home /News /maharashtra /

लढा जिंकूच! ‘या’ राज्याने तयार केली Covid-19 किट, अवघ्या 55 मिनिटांत लागणार कोरोनाचा निकाल

लढा जिंकूच! ‘या’ राज्याने तयार केली Covid-19 किट, अवघ्या 55 मिनिटांत लागणार कोरोनाचा निकाल

या मशिनच्या साहाय्याने सॅम्पल टेस्ट केल्यानंतर अवघ्या 55 मिनिटांमध्ये रिपोर्ट समोर येऊ शकतो.

    अमरावती, 8 एप्रिल : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री जगन रेड्डी (CM Jagan Reddy)  यांनी बुधवारी राज्यातील एका कंपनीद्वारे तयार केलेली टेस्टिंग किट लॉन्च केली. ही किट आंध्रप्रदेशातील विजाग येथील मेडटेक कंपनीने तयारी केली आहे. या किटच्या साहाय्याने कोरोना व्हायरसचा रिपोर्ट लवकरात लवकर समोर येईल, असा दावा या कंपनीने केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या दोन मशिनच्या साहाय्याने सॅम्पल टेस्ट केल्यानंतर 55 मिनिटांमध्ये रिपोर्ट समोर येऊ शकतो. सांगितले जात आहे की एक आठवड्याच्या आत अशी 10000 किट तयार करता येऊ शकतात. आंध्र प्रदेशात काल रात्रीनंतर कोरोना व्हायरसचे 15 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि येथील एकूण संसर्गांचा आकडा 329 पर्यंत पोहोचला आहे. जर स्वस्त दरात व तातडीने तपासणी करता आली तर लवकरात लवकर कोरोनाग्रस्तांची माहिती मिळू शकते व त्यानुसार त्यांना क्वारंटाइन करता येईल. अशा प्रकारेच कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य आहे. संबंधित - आशेचा किरण! देशातील 400 जिल्ह्यांमध्ये Covid – 19 चा एकही रुग्ण नाही नवीन रुग्ण आली समोर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताज्या बुलेटिनमध्ये सांगितले की आंध्रप्रदेशमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 329 झाली आहे तर एकूण 319 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आज संवाद साधला. पंतप्रधानांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि त्यांचीही मतं ऐकून घेतली. कोरोनाला आटोक्यात आणायचं असेल तर लॉकडाऊन वाढविण्यात यावा असं मत सर्वच नेत्यांनी व्यक्त केलं. संबंधित - रेल्वे अधिकाऱ्याने स्वत:च्या पैशातून गरजूंना केली मदत, CM ठाकरेंनी केलं कौतुक संपादन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या