जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हँडसम दिसण्यासाठी दाढी वाढवताय, CoronaVirus ला निमंत्रण देताय

हँडसम दिसण्यासाठी दाढी वाढवताय, CoronaVirus ला निमंत्रण देताय

हँडसम दिसण्यासाठी दाढी वाढवताय, CoronaVirus ला निमंत्रण देताय

तज्ज्ञांच्या मते, दाढीमुळे (Beards) मास्क चेह-यावर नीट फिट बसत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका 20 ते 1000 पटीपर्यंत वाढतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 एप्रिल : लांब दाढी आणि मिशी सध्याचा हा फॅशन ट्रेंड झाला आहे. तुम्हीदेखील असंच हँडसम आणि स्मार्ट दिसण्यासाठी दाढी-मिशी ठेवत आहात, तर सावध राहा. कारण दाढी-मिशीमुळे कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका वाढतो. जरी तुम्ही मास्क लावलात तरीही तुम्ही कोरोनाव्हायरसपासून सुरक्षित नाहीत. तज्ज्ञांच्या मते, दाढीमुळे मास्क चेह-यावर नीट फिट बसत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका 20 ते 1000 पटीपर्यंत वाढतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (Centers for disease control and prevention - CDC) ने 2017 साली यावर संशोधन केलं आहे.त्यानुसार चेह-यावरील केसांमुळे मास्क नीट काम करत नाहीत. कोबीवर सर्वात जास्त वेळ राहतो कोरोना; WHO च्या नावाने मेसेज व्हायरल दाढी ठेवणा-यांना असं वाटतं की, त्यांच्या चेह-यावरील केसांमुळे हवा फिल्टर होते आहे. मात्र हा त्यांचा गैरसमज असल्याचं CDC ने म्हटलं आहे. केस कधीही मास्कचं काम करू शकत नाहीत. तर उलट त्यामुळे चेह-यावरील मास्कचं सील सैल होतं. हे डोळ्यांनी दिसत नाही, मात्र मास्क लिकेज होण्याचा धोका 20 ते 1000 पटींपर्यंत वाढतो आणि अशात आजारी व्यक्ती त्यांच्या संपर्कात येणा-या सर्वांना संक्रमित करत जातो. Covid-19 पासून बचावासाठी लोकांनी वापरलेल्या या जगावेगळ्या मास्कच्या तऱ्हा! एजन्सी फॉर टॉक्सिक सबस्टन्स अँड डिसीज रजिस्ट्रीचे (agency for toxic substancesand disease registry) माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉबर्ट अमलेर यांच्या मते, “बहुतेक लोकांना मास्क वापरता येत नाही आणि अशात त्यांनी दाढी-मिशीवर मास्क लावला तर रेस्पिरेटरी सीलच्या लिकेजचा धोका वाढतो” त्यामुळे आता तात्पुरती तुमची फॅशन बाजूला ठेवा आणि कोरोनाव्हायरस होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्या. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात