मुझफ्फरनगर, 30 एप्रिल : उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खातौली येथील एका तरूणाने वडिलांच्या आजाराचे कारण देऊन लग्न केले. वडिलांच्या आजाराचे कारण देत पोलिसांना चकमा देऊन हा तरूण दिल्लीला पोहचला. खातौली येथील अहमद नावाच्या युवकाचे वडील इसरार यांच्यासमवेत त्यांन रुग्णवाहिकेतून दिल्ली गाठली आणि विवाह केला. लग्नानंतर हा तरुण त्याच रुग्णवाहिकेतून परत मुजफ्फरनगरला परतला.
दरम्यान, हे सगळे प्रकरण शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी खतौली हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असताना लोकांना अद्याप याचे गांभीर्य नाही आहे.
वाचा-परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारने अखेर उचलले पाऊल
वडिलांच्या आजाराचं दिलं कारण
अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षांच्या मुलाने मुजफ्फरनगरहून दिल्ली येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका बुक केली आणि आपल्या वडिलांना स्ट्रेचरवर ठेवले. जेव्हा पोलिसांनी त्याला मुजफ्फरनगर ते दिल्ली दरम्यान असंख्य ठिकाणी रोखले तेव्हा वडिलांच्या आजाराच्या प्रकृतीचे कारण सांगत दिल्ली गाठण्यात यश मिळविले. तेथे पोहचात त्यानं विवाह केला. लग्नानंतर त्याच रुग्णवाहिकेतून तो पत्नीसह घरी परतला.
वाचा-'चीन नव्हे अमेरिकेत आहे कोरोनाचा पेशंट झीरो', चीनच्या दाव्यात किती तथ्य?
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती
मात्र, जेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली तेव्हा कुटुंबातील सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले. संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच, 14 दिवसांसाठी त्यांना क्वारंटाइन सांगण्यात आले आहे. असं सांगितलं जात आहे की काही दिवसांपूर्वी अहमदने अप्पर गंगा कालवामार्गे वडील इसरारसमवेत दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी दोघांनाही घरी पाठवले. आता पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरूद्ध आयपीसी कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वाचा-Corona Effect : कोट्यवधींची कार विकणारी कंपनी आता करत आहे 'हा' व्यवसाय