मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महिलांपेक्षा पुरुष CoronaVirus चे सर्वाधिक शिकार, डॉक्टरांनी दिली 'ही' कारणं

महिलांपेक्षा पुरुष CoronaVirus चे सर्वाधिक शिकार, डॉक्टरांनी दिली 'ही' कारणं

कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण जास्त आहे.

कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण जास्त आहे.

कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण जास्त आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 08 एप्रिल : जगभरात 1,444,822 लोकं कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) विळख्यात सापडलेत. 83,109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरस रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण जास्त आहे. आकडेवारीनुसार मृतांमध्येही पुरुषांचा आकडा जास्त आहे. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 76 टक्के पुरुष कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आलेत. तर मृतांमध्येही 73 टक्के पुरुष आहेत. इतर देशातही परिस्थिती जवळपास सारखीच आहे. असं का? यामागे काय मेडिकल थिएरी असू शकते? याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे.अलजजीरामध्ये (Aljazeera) डॉ. सारा कयात यांनी याबाबत सविस्तर विश्लेषण केलं आहे. चुकीची जीवनशैली पुरुषांमध्ये तंबाखू आणि दारूसारखं व्यसन आणि खाण्यापिण्याच्या सर्वात जास्त चुकीच्या सवयी पुरुषांमध्ये जास्त असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुष 5 पट अधिक धूम्रपान आणि मद्यपान करतात. हात धुण्याची सवय साबण आणि पाण्याने हात धुवून कोरोनाव्हायरसपासून स्वतःचा बचाव करता येतो. मात्र डॉ. कयात यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, हात धुण्याच्या सवयीबाबत पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त सतर्क असतात. मेडिकल चेकअप आरोग्याबाबत पुरुषांपेक्षा महिला अधिक जागरूक आहेत. जनरल फिजिशिअनकडे पुरुष कमी जाताय. आपल्या समस्यांचा स्वीकार करण्यात आणि वैद्यकीय मदत घेण्यात पुरुषांना चांगलं वाटत नाही. त्यामुळे असं असू शकतं की पुरुष लक्षणं गंभीर होईपर्यंत वाट पाहत असतील आणि त्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता कमी झालेली असू शकते. रोगप्रतिकारक शक्ती इतर व्हायरससंबंधी याआधी झालेल्या अभ्यासानुसार व्हायरल इन्फेक्शनवेळी महिलांची रोगप्रतिकारक शक्ती योग्यप्रकारे काम करते, त्यामुळे महिला व्हायरल संक्रमण दूर करण्यात जास्त सक्षम असतात. हार्मोन थिएरी मासिक पाळीच्या चक्रात वेगवेगळ्या टप्प्यावर हार्मोन्समध्ये येणा-या बदलांवर व्हायरससंबंधी रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते, असं विविध अभ्यासाच्या हवाल्यानुसार या थिएरीत सांगण्यात आलं आहे. शिवाय गर्भनिरोधक गोळ्या, गर्भधारणा आणि मेनोपॉज या कालावधीतही हार्मोन्समध्ये बदल होतात. Covid-19 पासून बचावासाठी लोकांनी वापरलेल्या या जगावेगळ्या मास्कच्या तऱ्हा! कोबीवर सर्वात जास्त वेळ राहतो कोरोना; WHO च्या नावाने मेसेज व्हायरल संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या