कोरोनाच्या Rtpcr स्वॅब स्टिकची असुरक्षिपणे घराघरात पॅकिंग, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

कोरोनाच्या Rtpcr स्वॅब स्टिकची असुरक्षिपणे घराघरात पॅकिंग, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

एक हजार स्टिकची पॅकिंग केली की त्यांना अवघे 20 रुपये मिळतात.

  • Share this:

उल्हासनगर, 05 मे : तुम्हाला कोरोनाची (Corona Test) लागण झाली आहे का, याची खात्री तुमची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) केल्यानंतर समजते. मात्र ही आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी जी स्टिक वापरली जाते ती सुरक्षित आहे का याची कोणालाच थोडीशी देखील कल्पना नसते. त्यामुळेच बिनधास्तपणे आपण विश्वासाने आरटीपीसीआर चाचणी करत असतो. मात्र, उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar ) कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरली जाणारी स्टिक घराघरात उपलब्ध आहे असे सांगितल्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. उल्हासनगर मधील एका परिसरात घराघरात या कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणी साठी वापरले जाणाऱ्या स्टिकची पॅकिंग केले जाते आणि तीही कोणतीही काळजी न घेता.

उल्हासनगर कॅम्प 2 च्या खेमानी संत ज्ञानेश्वर नगर परिसरात घराघरात महिला, लहान मुलं या स्वॅब स्टिकची पॅकिंग करत आहेत. या कामामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. इथे या स्टिक जमिनीवर ठेऊन त्यांची प्लास्टिकच्या एका पॅकेटमध्ये पॅकिंग केली जाते.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची Fertility वयाबरोबर कमी का होते? कुठलं वय योग्य?

विशेष म्हणजे, एका ठेकेदाराने या महिलांना हे काम दिले असल्याचे महिला सांगतात, एक हजार स्टिकची पॅकिंग केली की त्यांना अवघे 20 रुपये मिळतात, या भागातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत ठेकेदार हे काम त्यांच्या कडून करवून घेत आहे.

ही पॅकिंग करताना कोणी मास्क लावत नाही,ना सॅनिटायझरचा वापर  केला जातो. त्यामुळे अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कोण करतंय हे अजून समोर आले नाही, मात्र एक ठेकेदार त्यांना हे काम देत आहे असे त्या म्हणतायत. त्यांच्यावर आणि यातील संबंधित मुख्य व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी  होत आहे.

हार्ट अटॅक आणि कोरोना संसर्ग यांमध्ये काय आहे संबंध? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणण

दरम्यान, कोरोना चाचणीशी संबंधित आरटीपीसीआरसाठी वापरल्या जाणाऱ्या या स्टिकची पॅकिंग झाल्यानंतर निर्जंतुकीकरण केले जात असेलही मात्र आशा प्रकारे घराघरात पॅकिंगसाठी ते दिले जाणे हे कितपत योग्य आणि सुरक्षित आहे., असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण समोर आल्यावर त्यावर कशा प्रकारे कारवाई केली जाईल हे पाहावं लागेल. उल्हासनगर सारखा हा प्रकार राज्यातील अनेक भागात  सुरू असण्याची शक्यता वर्तवली जातोय.

Published by: sachin Salve
First published: May 5, 2021, 7:43 AM IST
Tags: corona

ताज्या बातम्या