• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • हार्ट अटॅक आणि कोरोना संसर्ग यांमध्ये काय आहे संबंध? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

हार्ट अटॅक आणि कोरोना संसर्ग यांमध्ये काय आहे संबंध? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

Heart attack

Heart attack

प्रसिध्द टिव्ही पत्रकार रोहित सरदाना आणि सितारवादक पंडित देबू चौधरी यांच्यावर कोरोना संसर्गामुळे उपचार सुरु असताना हार्ट अॅटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 5 मे: वेगाने पसरणाऱ्या कोरोना (Corona) संसर्गाच्या काळात कोरोनाबाधित रुग्णाला अचानक हार्ट अटॅक (Heart Attack) म्हणजे हृदय विकाराचा झटका आला आणि यामुळे काही रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. प्रसिध्द टिव्ही पत्रकार रोहित सरदाना आणि सितारवादक पंडित देबू चौधरी यांच्यावर कोरोना संसर्गामुळे उपचार सुरु असताना हार्ट अॅटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रकार जास्त समोर येऊ लागला. कोरोना संसर्ग आणि हार्ट अॅटॅक याचा काही संबंध आहे का हा चिकित्सा विज्ञानाचा विषय आहे. जाणून घेऊया याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात ते... विषाणू संक्रमणाने हृदयावर येतो ताण आंतरराष्ट्रीय कार्डीयोवॅस्क्युलर सर्जन आणि मेट्रो हॉस्पिटल्स अॅण्ड हार्ट इन्स्टिटयुटच्या कार्डीयाक कॅथ लॅबचे संचालक डॉ. समीर गुप्ता यांनी याबाबत सांगितले की हृदयाच्या आर्टलरी (Artillery) मध्ये रक्ताची गुठळी (Blood Clot) तयार झाली तर हार्ट अटॅक येतो आणि हृदयात अचानक बिघाड झाला तर त्याच्या ऱ्हिदममध्ये (Rthyem)अडथळे निर्माण होतात त्याला कार्डीयाक अरेस्ट (Cardiac Arrest) म्हणतात. हा प्रकार फारच नुकसान कारक असतो. कारण यात रुग्णाला वाचवण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. कोरोनाचा संबंध या दोन्ही प्रकारांशी आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाचे ऱ्हिदम खराब होऊ शकतात तर कार्डियाक अरेस्टमध्ये तर ही ऱ्हिदम खराब होतेच. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर हृदयावर ताण येतो. यात अनेकदा हृदयाच्या स्नायूंना सूज येऊ शकते. संसर्गामुळे हृदयाच्या पेशींना नुकसान पोहोचते. याप्रकारे कोविड 19 विषाणूचा संसर्ग हृदयाला नुकसानकारक ठरतो. हे ही वाचा-फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम,ऑक्सिजन लेवल सुधारण्यास होईल मदत कोविड-19 हृदयावर परिणाम करतो डॉ. समीर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत रिपोर्टसवरुन असे दिसून आले आहे की, कोविड 19 केवळ फुफ्फुसांवरच नाही तर शरीरातील अन्य अवयवांवर देखील परिणाम करतो. यात अर्थातच हृदयाचाही समावेश आहे. कोरोनाबाधितांमध्ये संसर्गामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे दिसून आले आहे. या गुठळ्या जर हृदयात पोहोचल्या तर त्या धोकादायक ठरु शकतात. कारण त्या हार्ट अॅटॅक किंवा कार्डियाक अॅरेस्ट चे कारण असतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे? डॉ. समीर गुप्ता म्हणतात,की कोरोनाचा संसर्ग झाल्यावर आपल्या हृदयाची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. नियमित व्यायाम आणि शारिरीक हालचाली करणं तसेच सक्रिय राहणं याकरिता महत्वाचं आहे. तसेच आहारात हृदय निरोगी राहिल अशा पदार्थांचा समावेश करणं हे देखील जरुरीचं आहे. हृदयाशी संबंधित काही त्रास होऊ नये, यासाठी काय करावे? रक्तदाब, हायपरटेन्शन, स्मोकिंग, हाय कोलेस्ट्रॉल, अधिक वजन, अत्याधिक लिपिड स्तर ही हृदयरोगाची प्रमुख कारणं आहेत. कोविड संसर्गात याविषयी रुग्णाने अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास, छातीत दुखणं, पायांवर सूज, घाम येणं अशा तक्रारी असतील तर त्यास तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करावं. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्त तपासणी, एक्स रे, ईसीजी आदी तपासण्या करुन घ्याव्यात.
  First published: