मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपच्या महिला आमदार कोरोना पॉझिटिव्ह, मराठा मोर्चाच्या बैठकीला होत्या उपस्थित

भाजपच्या महिला आमदार कोरोना पॉझिटिव्ह, मराठा मोर्चाच्या बैठकीला होत्या उपस्थित

आमदार देवयानी फरांदे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि मराठा बांधवांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

आमदार देवयानी फरांदे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि मराठा बांधवांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

आमदार देवयानी फरांदे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि मराठा बांधवांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

नाशिक, 13 सप्टेंबर: नाशिकच्या (मध्य) भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रविवारी नाशिकमध्ये दुपारी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत आमदार देवयानी उपस्थित होत्या. मात्र आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि मराठा बांधवांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा...आता या शहारात होणार नाही लॉकडाऊन, पालकमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

मराठा कार्यकर्त्यांनी घातला होता घेराव...

आमदार देवयानी फरांदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत भाषण करत असताना काही मराठा बांधवानी त्यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्या भोवती घेराव घालून गोंधळ घातला होता. त्याच्या काही वेळानेच आमदार फरांदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत यांनी फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

'मी चार ते पाच वेळा कोरोना चाचणी केली आहे. मात्र निगेटिव्ह आली. मुंबई अधिवेशन आणि जळगाव येथे प्रवास केल्यामुळे खबरदारी म्हणून पुन्हा टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी, ही विनंती अशी पोस्ट त्यांनी फेसबुक वर केली आहे. तसेच मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत हजर होईल, असं आश्वासन देखील त्यांनी नाशिककरांना दिलं आहे. मात्र त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि मराठा बांधवांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव नाराज झाले आहेत. त्यामुळे मराठा संघटनांनी आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. या तीन दिवसांत शासनानं आपली भूमिका स्पष्ट न केल्याने रविवारी नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत मराठा बांधवानी आपली पुढची रणनीती ठरवल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे भाषण करत असताना बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार देवयानी फरांदे यांच्या भाषणाला एका गटाचा कडाडून विरोध केला होता.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला जिल्हाभरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मराठा बांधवांनी सहभाग घेतला होता. दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. त्यात मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले. तसेच जो आमदार, खासदार शासनाला अथवा आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना खुले पत्र देणार नाही. त्यांच्याविरोधात गमिनी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला आहे.

हेही वाचा...खासदार नवनीत राणा यांनी आता 'या' वादात घेतली उडी, साधला थेट मुख्यमंत्र्यावर निशाणा

भाजपला एका गटाचा विरोध...

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार फरांदे यांच्या भाषणाला एका गटाने विरोध केला. यावेळी आमदार फरांदे भाषणाला उभ्या राहताचं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यामुळे बैठकीदरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

First published: