या गावात लोकच काय तर जनावरांनाही No Entry,तरुणांनी हातात घेतले दांडुके

या गावात लोकच काय तर जनावरांनाही No Entry,तरुणांनी हातात घेतले दांडुके

राज्याची राजधानी मुंबई पाठोपाठ आता उपराजधानी नागपूर शहरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरला आहे.

  • Share this:

नागपूर, 9 मे: राज्याची राजधानी मुंबई पाठोपाठ आता उपराजधानी नागपूर शहरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरला आहे. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

नागपूर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 280 वर पोहोचला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूर शहराला लागून असलेली ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वेळाहरी या गावातील नागरिकांनी संतप्त पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा.. भीषण अपघात: डॉक्टर पत्नीसह पतीचा मृत्यू, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

नागपूरातील लोकंच काय, शहरातील जनावरांनाही गावात येऊ दिलं जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यासाठीच वेळाहरी गावकऱ्यांनी गावाच्या सर्व सीमा सील केल्या आहेत.

गावातील प्रवेशव्दारावर बाभळीच्या काटेरी फांद्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच काटेरी झुडपांनी गावाच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे नागपूरातील लोकंच काय तर शहरातून येणारी जनावरांनाही गावात प्रवेश करु शकत नाही. नागपूर शहरातून एखाद्याचे नातेवाईक आले तर त्यांना गावाबाहेरच भेटण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे, नागपूर शहरातील कंटेनमेंट झोन परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास त्यांची रवानगी थेट विगलीकरण कक्षात केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे. त्याबरोबर पोलिसांशी हुज्जत घातणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...अयोध्या राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांसाठी खूशखबर!वाचा काय आहे मोदी सरकारचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागपुरात पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या  पार्श्वभूमीवर त्यांनी पोलिसांना आणखी कठोर कारवाई करण्याची सूचना दिल्या आहेत.

First published: May 9, 2020, 3:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या