Home /News /maharashtra /

माओवाद्यांबरोबरच्या चकमकीत मोठा शस्त्रसाठा जप्त, कुकरबाँबच्या स्फोटामुळे हादरला परिसर; पाहा LIVE VIDEO

माओवाद्यांबरोबरच्या चकमकीत मोठा शस्त्रसाठा जप्त, कुकरबाँबच्या स्फोटामुळे हादरला परिसर; पाहा LIVE VIDEO

पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 माओवाद्यांना (Maoist) कंठस्थान घालण्यात पोलिसांना शुक्रवारी यश मिळालं होतं. गडचिरोलीतील (Gadchiroli) पोलीस दलाची ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे.

गडचिरोली, 22 मे: पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 माओवाद्यांना (Maoist) कंठस्थान घालण्यात पोलिसांना शुक्रवारी यश मिळालं होतं. गडचिरोलीतील (Gadchiroli) पोलीस दलाची ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे. गडचिरोली जिल्हयात काल झालेल्या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांवर साठ लाखांचे बक्षीस होते. सात महिलासंह सहा माओवाद्यांचा त्यात समावेश असुन यातील सतीश मोहदा याच्यावर सर्वाधिक सोळा लाखाचे बक्षीस होते. गडचिरोली जिल्हयात महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडो (Maharashtra Police C-60 Commando) पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. एटापल्लीच्या जंगलातून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. हे माओवादी ठार झाल्याने जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा फटका बसल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल सांगतात. दरम्यान काल गडचिरोली जिल्हयात झालेल्या चकमकीनंतर मोठया प्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता. त्यात एक कुकरबाँबही जवानांना आढळून आला होता. हा कुकरबाँब घटनास्थळी स्फोट करुन निष्क्रिय करण्यात आला. विशेष खबरदारी घेत हा कुकरबाँब निष्क्रिय करण्यात आला. या स्फोटाने जंगल परिसर हादरुन गेला होता. या घटनेचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हयात माओवाद्याचा जंगलात खात्मा करणाऱ्या जवानांचे शुक्रवारी संध्याकाळी जल्लोषात गडचिरोलीमध्ये स्वागत करण्यात आले. सी सिक्स्टी कमांडो हे माओवादविरोधी विशेष पथक असून शुक्रवारी जवान पोलीस मुख्यालयात पोहचताच गडचिरोली पोलिसांच्या बँड पथकाकडून वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यालयातील जवानांसह वरिष्ठ अधिकाऱ्याकडुन टाळ्या वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. हे वाचा-बिहार निवडणुकीत भाजपची उधळपट्टी, स्टार प्रचारकांच्या विमान प्रवासावर 24कोटी खर्च तेरा माओवाद्यांना ठार करण्यात आल्याने, पोलिसांचं हे एक मोठं यश मानलं जात आहे. कारण कसनासूर चकमकीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 2018 मध्ये 40 माओवादी कसनासूर चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आज 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Gadchiroli, Naxal Attack

पुढील बातम्या