अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 12 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मुंबई ते सोलापूर ही वंदे भारत ट्रेन धावू लागली. विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील नामवंतांनी या पहिल्या प्रवासाचा लाभ घेतला. या प्रवासात लक्ष्मी वसंत मोरे या आजीबाईंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या आयुष्यातील एका खास योगामुळे मोरे कुटुंबीयांना वंदे भारत एक्स्प्रेस कायम लक्षात राहणार आहे. ट्रेनमध्ये वाढदिवस पुण्यावरून सोलापूरला अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आजीबाई निघाल्या होत्या. त्याचवेळी आजोबांचा मुलगा मच्छिंद्र आणि त्यांच्या पत्नीने आजीबाईंना एक वेगळेच सरप्राईज दिले. आजींचा त्याच दिवशी 75 वा वाढदिवस होता त्या निमित्तानं वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासादरम्यान आजींचा केक कापून वाढदिवस साजरा केला. या जबरदस्त योगामुळे आजींच्या हा वाढदिवस कायम स्मरणात राहणार आहे. Vande Bharat Express Train : कशी आहे मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’? पाहा Inside Photos मोरे आजींच्या तीन मुली वैशाली खैरे ,सविता कुकडे आणि शर्मिला पवार तसेच मच्छिंद्र आणि अमित मोरे हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. मोरे आजी 75 व्या वर्षीही फिट आहेत. त्यांचे पती वसंत मोरे देखील यावेळी मोठ्या उत्साहानं या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ची सर्व माहिती वाचा एका क्लिकवर आम्ही सर्व मोरे कुटुंबीय पुण्याहून या रेल्वेमध्ये बसलो. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत ट्रेनमध्ये बसण्याचे भाग्य आम्हाला लाभले. मुलांनी माझा वाढदिवस या ट्रेनमध्ये साजरा केला हे खरंच माझ्यासाठी सरप्राईज होते, अशी भावना लक्ष्मी मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.