मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारपासून (10 फेब्रुवारीपासून) सुरू झाली. या रेल्वेत प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सोयी उपलब्ध आहेत.
कुणाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये ट्रेन ऑपरेटरची संवाद साधायचा असेल तर टॉक बॅक युनिट प्रणाली बसवण्यात आली आहे.
गाडी थांबवण्यासाठी पूर्वी चेन ओढावी लागत असे. वंदे भारतमध्ये एका स्पेशल बटनाच्या माध्यमातून गाडी थांबवणे शक्य आहे.
सर्वसामान्यांसोबतच अंधांना देखील आपला सेट क्रमांक व्यवस्थित वाचता यावा यासाठी सीट नंबर सांख्यिकी पद्धतीमध्ये तसेच ब्रेल लिपीमध्ये सुद्धा लिहिण्यात आले आहेत.
लहान मुलांसाठी सापशिडी खेळण्याचीही व्यवस्था आहे. मुंबई ते सोलापूर दरम्यान ज्या ठिकाणी गाडीचा थांबा आहे त्या सर्व स्टेशनचा या सापशिडीमध्ये समावेश आहे.
रूप माऊंटेन पॅकेज युनिट ही अत्याधुनिक सिस्टीम वंदे भारतमध्ये वापरण्यात आली आहे. तांत्रिकदृष्ट्या सर्वात मोठे आकर्षण ही सिस्टीम ठरत आहे.
प्रत्येक कोचमधील डिस्प्लेवर गाडीचा स्पीड किती आहे आणि पुढील स्टेशन येण्यासाठी किती किलोमीटर अंतर बाकी आहे ही माहिती डिस्प्ले होते.
मुंबई-सोलापूर प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला चॅट बॉक्स सुद्धा मिळणार आहे . यामध्ये बाकरवडी, कचोरी ,समोसा ,गुलाबजाम आणि चिक्की हे पदार्थ असतील.
पहिल्या दिवशी प्रवासात पनीर मसाला, मटर मसाला, दोन चपाती ,एक स्वीट, लोणचं दाल तडका, जीरा राईस आणि बडीशोप असे जेवण देण्यात आले होते.