प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 25 सप्टेंबर : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. विधानसभेच्या निवडणुकांसोबतच आता लोकसभेची पोटनिवडणुकही होत आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलीय. उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने नवा प्लॅन केला असून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला देण्यात आलीय. या जागेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरविण्याचा काँग्रेसचा विचार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चव्हाण यांच्या नावाचा आग्रह धरला असून पृथ्विराज चव्हाण यांचं नाव निश्चित होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.
शिवरायांचे संस्कार...आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही!
महाराष्ट्र विधानसभा उमेदवाराच्या नावावर निर्णय घेण्यासाठी उद्या 26 सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता छाननी समितीची बैठक होणार आहे. 15 गुरूद्वारा रकाबगंज येथील काँग्रेसच्या वॉर रूम मध्ये ही होणार बैठक. सोबतच सायंकाळी होणार केंद्रीय निवडणूक समितीचीही बैठक होणार आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक होणार असून त्यात चव्हाणांच्या नावावार शिक्कामोर्तब होऊ शकते.
पृथ्विराज चव्हाण हे सध्या दिल्लीत असून ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. ही लढत झाली तर ती लढत चांगलीच रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
विधानसभेआधी राजू शेट्टींना दुसरा मोठा धक्का, प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणा
युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात
भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलीय. शेवटच्या 11 जगांचा प्रश्नं काही प्रमाणात सुटून तो आता फक्तं 5 जागांच्या तडजोडीवर आलाय. आता 5 विधानसभा मतदारसंघातील तीढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात होणाऱ्या अंतीम चर्चेतून सोडवला जाणार आहे.
युतीच्या जागावाटपात दोन्ही पक्षांनी युती तूटेल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतल्यामुळे युती अभेद्य रहाणार असल्याचं दिसतंय. दोनही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यामुळे परिस्थिती बदललीय या बदलत्या परिस्थित काही अडचणी असल्याने हा विलंब होत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तुटेपर्यंत ताणणार नाही असं दोन्ही पक्षांनी ठरविल्यामुळे युती तुटणार नाही हे निश्चत समजलं जातंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Satara S13p45, Udyanraje Bhosle