जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवरायांचे संस्कार...आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही!

शिवरायांचे संस्कार...आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही!

Photo- Twitter

Photo- Twitter

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला इशारा दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर : ‘महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. आम्ही कधीही दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला इशारा दिलं आहे. ‘मी स्वत:हून ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांना माहिती द्यायला तयार आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण 27 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती दिली आहे. ‘मी आयुष्यात कधी सहकारी बँकेत कधी संचालक नाही, ईडीने काय तपस करायचा तो करावा,’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभेआधी राजू शेट्टींना दुसरा मोठा धक्का, प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार? ‘मला 1980 साली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत अटक झाली. त्यानंतर आता कारवाईची ही दुसरी घटना आहे. ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. एक महिना निवडणूक प्रचारसाठी मी महाराष्ट्रभर जाणार आहे. त्यामुळे या काळात मी मुंबई बाहेर असेल. जर ईडीला मला संदेश पाठवायचा असेल तर मी 27 सप्टेंबर ला स्वतः जाईल आणि ईडीचा काही पाहुणचार असेल तो देखील घेईल,’ असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रभरात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हे दाखल केल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. शरद पवार यांच्या फोटोसह ‘आय सपोर्ट शरद पवार’ असा मजकूर राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादी रान पेटवण्याची चिन्ह आहेत. VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात