विधानसभेआधी राजू शेट्टींना दुसरा मोठा धक्का, प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 04:06 PM IST

विधानसभेआधी राजू शेट्टींना दुसरा मोठा धक्का, प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई, 25 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाराज नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

सदाभाऊ खोत यांनी भाजपशी सलगी करत नव्या संघटनेची स्थापना केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आक्रमक रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यपदी नेमणूक केली. लोकसभा निवडणुकीत रविकात तुपकर यांनी अत्यंत आक्रमकपणे भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता.

लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना आघाडीच्या जागावाटपामुळे इच्छा असूनही लढण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना विधानसभेचं आश्वासन दिल्याचं बोललं गेलं. मात्र आताही त्यांना कोणताही मतदारसंघ सोडला जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, रविकांत तुपकर यांनी पक्ष सोडल्यास राजू शेट्टी यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. आधी सदाभाऊ खोत यांनी संघटनेपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षांच्याच भाजप प्रवेशाची चर्चा होत आहे. त्यामुळे राजू शेट्टी या सर्व अडचणीतून कसा मार्ग काढतात, हे पाहावं लागेल.

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...