'बकरी ईद'वरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजीचा सूर, काँग्रेस आमदार म्हणाले...

'बकरी ईद'वरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजीचा सूर, काँग्रेस आमदार म्हणाले...

एक दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'बकरी ईद'वरून आता महाविकास आघाडी सरकारामध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै: एक दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'बकरी ईद'वरून आता महाविकास आघाडी सरकारामध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील मुस्लिम नेत्यांमध्ये बकरी ईद यावरून नाराजी पसरली आहे. काँग्रेस आमदार झिसान सिद्धिकी यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.

हेही वाचा...सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव?

वांद्रे (पूर्व) काँग्रेस आमदार झिसान सिद्धिकी यांनी सांगितलं की, महाविकास आघाडी सरकारने कुर्बानीसाठी बकरा ऑनलाइन खरेदीची परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला सुरूवातीपासूनच विरोध करण्यात आला होता. सरकारनं आपला निर्णय बदलावा, अशी मागणीही करण्यात आली होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली. मात्र, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. एक दिवसांवर बकरी ईद हा सण आला असूनही सरकारने आपल्या निर्णयात बदल केलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाची मी माफी मागतो, यापुढे समाजाचे मुद्दे यासाठी वारंवार प्रयत्न करू, असं आमदार झिसान सिद्धिकी यांनी म्हटलं आहे.

ऑनलाइन बकरी खरेदी करणे कठीण तसेच कुर्बानी देण्यावरून सरकारमधील मुस्लिम आमदार नाराज झाले आहेत. बकऱ्याच्या गाड्यांना पोलिसांनी शहरात प्रवेश न दिल्याने आता काँग्रेस पक्षातील आमदारांनी नाराजी सूर काढला आहे. काँग्रेस आमदार झिसान सिद्धिकी यांनी स्वत:च्या सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, याआधी  माजी मंत्री नसीम खान यांनी सरकार विरोधात थेट नाराजी व्यक्त केली होती.

प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारनं नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. मात्र, सरकारच्या गाईडलाईनला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी कडाडून विरोध केला आहे.

काँग्रेस नेते नसीम खान यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. बकरी ईद साजरी कशी करावी, या संदर्भात राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांना नसीम खान यांनी विरोध दर्शवला आहे. प्रतिकात्मक बकऱ्याची कुर्बानी होऊ शकत नाही किंवा ऑनलाइन खरेदी होऊ शकत नाही. प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी असल्याने उद्धव ठाकरे सरकारची ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारत नसल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारनं तात्काळ बैठक घेऊन या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावा, असंही नसीम खान यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, घरीच साजरी करा बकरी ईद...

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं आपल्याला परवडणारं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद देखील घरीच साजरी करा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यंदा वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

हेही वाचा... पुढच्या 8 दिवसांत कोरोना हरवण्यासाठी पुणे होणार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी दिला आदेश

काय आहेत राज्य सरकारच्या गाईडलाईन....

- बकरे खरेदी करा ऑनलाइन...

-बकरे खरेदी करण्यासाठी बाजार भरणार नाही...

- कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये...

- प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावानं ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करून घ्यावी, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याबाबत काळजी घ्यावी...

-काही एनजीओंनी याबाबत पुढाकार घेतला आहे. मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- राहत्या घरीच बकरी ईदची नमाझ अदा करावी.

Published by: Sandip Parolekar
First published: July 31, 2020, 1:46 PM IST
Tags: Congress

ताज्या बातम्या