लातूर, 10 ऑक्टोबर: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजिव आणि आमदार धीरज देशमुख यांनी आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. याबाबत आमदार धीरज देशमुख यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात ते आईला औक्षण करून तिचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
हेही वाचा...रितेश-जेनेलियाने का सोडलं नॉनव्हेज? कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
'सण असो व आमचा वाढदिवस लहानपणापासून आई नेहमीच आम्हाला औक्षण करून आशीर्वाद देतात. आज आईंचा वाढदिवस असल्याने मी त्यांचे औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतला व ईश्वरचरणी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. प्रत्येक जन्मी मला त्यांचेच मातृसुख लाभावे, असे साकडेही मी ईश्वराकडे घातले आहे', असंही आमदार धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.
सण असो व आमचा वाढदिवस लहानपणासून आई नेहमीच आम्हाला औक्षण करून आशीर्वाद देतात.आज आईंचा वाढदिवस असल्याने मी त्यांचे औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतला व ईश्वरचरणी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. प्रत्येक जन्मी मला त्यांचेच मातृ सुख लाभावे, असे साकडेही मी ईश्वराकडे घातले. pic.twitter.com/U55OQbmUsm
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) October 10, 2020
विलासराव देशमुख यांनी तीन मुले आहेत. अमित, रितेश आणि धीरज या पैकी दोघे राजकारणात सक्रीय आहेत. विशेष म्हणजे अमित आणि धीरज हे दोघे आमदार आहेत. धीरज यांनी बॉलिवूड अभिनेत्याच्या बहिणीशी विवाह केला आहे.
कोण आहे आमदार धीरज देशमुख यांची पत्नी...
वडिलांच्य पश्चात धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीनमधून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवलीच नाही तर जिंकली सुद्धा. धीरज यांनी बॉलिवूडमधील अभिनेते जॅकी भगनानी यांच्या बहिणीशी विवाह केला आहे. दिपशिखा उर्फ हानी असं धीरज यांच्या पत्नीचं नाव आहे. दिपशिखा या चित्रपट निर्मात्या असून त्यांना एक मुलगा आहे.
हेही वाचा...पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! डिसेंबर-जानेवारीत आणखी वाढणार कोरोनाची आकडेवारी
रितेश-जेनेलियानं घेतला मोठा निर्णय...
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांना नेहमी फिट राहणं गरजेचं असतं. यासाठी जिम, योगा, डाएट हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो. अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलियादेखील (genelia dsouza) स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता त्यांचा उद्देश आहे तो अवयवदान. अवयवदानासाठी आपलं शरीर निरोगी असावं, अवयव चांगले राहावेत यासाठी दोघांनीही काही निर्णय घेतले आहेत.