रितेश आणि जेनेलिया यांनी नॉनव्हेज खाणं सोडलं आहे. शिवाय ब्लॅक कॉफी आणि एयरेटेड ड्रिंक्स न पिणंही सोडलं आहे. यामुळे अवयवांना मोठं नुकसान होतं, त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
1 जुलैला डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने रितेश आणि जेनेलियाने आपण अवयवदान करत असल्याचं जाहीर केलं होतं. दोघांनीही आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे वाचा - अखेर नेहा कक्करने केला खुलासा, PHOTO शेअर करत सांगितलं कोणाला करतेय डेट नॉनव्हेजमधून व्यक्तीला मोठ्या प्रमाणात प्रोटिन मिळतं. पण याचा शरीरावर मोठा प्रतिकूल परिणामदेखील होतो. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे शरीराला नुकसान पोहोचतं. ज्याप्रमाणे सिगारेटमुळं शरीराला नुकसान होतं तसंच नुकसान कॉफीमुळे होतं आणि यामुळे रितेश आणि जेनेलिया दोघांनीही याचं सेवन करणं सोडलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Fitness, Organ donation, Riteish Deshmukh