धनत्रयोदशी आधी स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची योजना

धनत्रयोदशी आधी स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची योजना

SGB Series VIII: सॉव्हरेन गोल्ड बाँडची आठव्या सीरिजचे सब्सक्रिप्शन सोमवारपासून सुरू होणार आहे. तुम्ही यामध्ये 13 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. तसंच ऑनलाइन पेमेंट केल्यास गुंतवणुकदारांकडे आणखी फायद्याची संधी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी अधिक वाढते. गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करण्याऐवजी लोकांचा कल इतर प्रकारे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond Scheme) मध्ये गुंतवणूक वाढली आहे, यामध्ये  तुम्हाला सरकारी गॅरंटीने सोने खरेदी करता येते.

दिवाळसण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, अशावेळी सोनं खरेदी करण्यासाठी तुमची लगबग असेल. त्यामुळे या दिवसात सॉव्हरेन गोल्ड बाँड हा चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला बाजारभावापेक्षा काहीशा कमी दराने सोनेखरेदी करता येईल. सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme 2020-21) सी​रीज VIII सोमवारपासून अर्थात 9  नोव्हेंबरपासून सुरू करत आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे सब्सक्रिप्शन खरेदी करता येईल. यावेळी आरबीआयकडून सोन्याचे भाव 5,177 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आले आहे.

(हे वाचा-LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000, एकदाच भरावा लागणार प्रीमियम)

SGB साठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यानंतर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सवलत देखील देण्यात येईल. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी ही किंमत 5127 रुपये असेल.  याआधीच्या 12 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात  आलेल्या गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये होती.

(हे वाचा-'मुलीचं लग्न धुमधडाक्यात करायचं होतं पण...' फटाक्यांमध्ये गुंतवले लग्नाचे पैसे)

सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे गोल्ड बाँड जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे हा आहे, जेणेकरून सोन्याची आयात कमी केली जाईल. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

किती करता येईल गुंतवणूक?

सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये वैयक्तिक स्वरुपात कमीत कमी 1 ग्रॅम तर जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची गुंतवणूक करता येते. या बाँडच्या मॅच्यूरिटीचा कालावधी 8 वर्षांचा असतो. मात्र यामध्ये गुंतवणुकीनंतर पाचव्या वर्षी स्कीममधून बाहेर पडण्याचा देखील पर्याय असतो.

Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

वार्षिक किती व्याज मिळेल

सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये 2.5 टक्क्यांचे व्याज मिळते. गोल्ड बाँडमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे याच्या स्टोअरेजची चिंता करावी लागत नाही. डिमॅटमध्ये ठेवल्यास याकरता कोणताही जीएसटी द्यावा लागत नाही. जर गोल्ड बाँडच्या मॅच्यूरिटीवर कोणताही कॅपिटल गेन्स बनला तर यावर सूट मिळते. गोल्ड बाँडवर हा एक्सक्लूझिव्ह लाभ मिळतो.

कुणाला करता येईल गुंतवणूक?

सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये ती प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करू शकते जी भारतात वास्तव्य करते. तुम्ही तुमच्यासाठी किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर संयुक्त पद्धतीने याची खरेदी करू शकता. अल्पवलीन मुलांच्या नावे देखील गोल्ड बाँड खरेदी केले जाऊ शकतात. यात एक विद्यापीठ, धर्मादाय संस्था किंवा ट्रस्ट बॉन्ड धारक असू शकतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 7, 2020, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading