नांदेड, 02 नोव्हेंबर : नांदेड (Nanded) जिल्ह्यात झालेल्या देगलूर - बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (deglur bypoll election 2021) दणदणीत विजय मिळवून काँग्रेसने (congress) भाजपला (bjp) धूळ चारली. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपा दोघांसाठी प्रतिष्ठेची होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडहा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा राखणे अशोक चव्हाण यांच्यासाठी महत्वाचे होते. तर भाजपाला देखील आपल्याच बाजूने जनतेचा कल आहे हे दाखवून देण्यासाठी ही निवडणूक जिंकने भाग होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी आणि भाजपा दोघांनी जोरदार प्रचार सुरू केला. भाजपचे अनेक नेते, केंद्रीय मंत्री देगलूरला आले. तर महाविकास आघाडीचे नेते सुद्धा देखील तळ ठोकून होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असं वाटत होतं. पण निकाल पाहता ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे तब्बल 41933 इतक्या मताधिक्याने निवडुन आले. भाजपच्या पराभवाची कारणे भाजपने देगलूरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. कदाचित ही भाजपची पहिली चूक ठरली. कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असताना देखील सुभाष साबणे यांचा 22 हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला. मतदारांनी ज्याला नाकारल त्याच उमेदवाराला भाजपाने उमेदवारी दिली. सुभाष साबणे यांनी शिवसेना सोडल्याचा राग सामन्य शिवसैनिकांमध्ये होता. त्यामुळे सेनेने त्यांचा विरोधात जोरदार प्रचार केला. लेकीच्या हत्येसाठी बापाला डांबलं तुरुंगात, 3 वर्षांनी मुलगीच आली समोर ऐनवेळी अशोक चव्हाण यांचे भावजी भास्करराव पाटील खतगावकर हे काँग्रेसमध्ये परतले. या मतदारसंघात खतगावकर यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. प्रचार करतांना भाजपा नेत्यांनी अशोक चव्हाण यांना टार्गेट केलं. त्यांच्या ईडीची कारवाई करण्याचे संकेत भाजपा नेते देत होते. पण भाजपाची ही नीती त्यांच्याच अंगलट आली. निवडणुकीत दबाव आणला जात असल्याचा प्रचार काँग्रेसने केला. अशोक चव्हाण यांच्यावर व्यक्तिगत टीका झाल्याने मतदारामध्ये अशोक चव्हाण यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. शिवाय जितेश अंतापूरकर यांच्याबद्दल देखील लोकांमध्ये सहानुभूती होती. वंचित फॅक्टर फेल तसंच, वंचित आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, असं एक गणित होतं. कारण लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण या निवडणुकीत वंचितला देखील जास्त मतं मिळाली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक खूप गांभीर्याने घेतली. सूक्ष्म असं नियोजन त्यांनी केलं. प्रचंड मेहनत घेतली. परिणामी काँग्रेसला विक्रमी विजय मिळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.