मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची भीती, सोनिया गांधी बॅकफूटवर, हायकमांडने मोठा निर्णय बदलला

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची भीती, सोनिया गांधी बॅकफूटवर, हायकमांडने मोठा निर्णय बदलला

सोनिया गांधी

सोनिया गांधी

शिवसेनेच्या फुटीनंतर आता काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे.

  • Published by:  Chetan Patil

विनोद राठोड, मुंबई, 20 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. शिवसेनेत पडलेली फूट हे त्याचं ताजं उदाहरण आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर आता काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचं नाव त्यामध्ये आघाडीवर होतं. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण त्यावर चव्हाणांनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. पण तरीही काँग्रेसचा मोठा गट फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने मोठा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेसचे 11 आमदार सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांड या 11 आमदारांवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. या आमदारांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचंदेखील नाव होतं. या कारवाईमुळे अशोच चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तर मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. कदाचित महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आमदार त्यांच्यासोबत भाजपमध्ये जावू शकतात. या भीतीने काँग्रेस हायकमांडने त्या 11 आमदारांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे 11 आमदारांवर कारवाई करण्याची शिफारस निरीक्षक मोहन प्रकाश यांनी केली होती. पण आता कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती.

(मेळघाटात आदिवासी महिला आक्रमक, अजित पवारांचा अडवला ताफा, विचारला जाब)

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा विजय झाला. तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची बातमी समोर आली होती. या घटनेप्रकरणी देखील पक्षात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

(काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा 'नकार', आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण? हे नाव चर्चेत)

पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही कारवाई मागणी केली होती. एका दलित उमेदरावाचा पराभव ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असंदेखील पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांना याप्रकरणी निरीक्षक म्हणून नेमलं होतं. त्यानंतर मोहन प्रकाश यांनी महाराष्ट्रात येवून तपास केला आणि त्याचा अहवाल हायकमांडकडे सुपूर्द केला होता. तसेच 11 आमदारांवर पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची शिफारस केली होती. पण कारवाई केली तर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

" isDesktop="true" id="749389" >

विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या काँग्रेस हायकमांडची 'या' आमदारांना दिली होती नोटीस

अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

विजय वडेट्टीवार, माजी मंत्री

झिशान सिद्दिकी, आमदार वांद्रे पूर्व

धीरज देशमुख, लातूर ग्रामीण

कुणाल पाटील, धुळे ग्रामीण

राजू आवळे, हातकणंगले

मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिण

शिरीष चौधरी, रावेर

माधवराव पाटील जवळगावकर, हदगाव-हिमायतनगर

First published:

Tags: Ashok chavan, Sonia gandhi, Young Congress