जाहिरात
मराठी बातम्या / देश / काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा 'नकार', आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण? हे नाव चर्चेत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा 'नकार', आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण? हे नाव चर्चेत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा 'नकार', आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण? हे नाव चर्चेत

Congress Rahul Gandhi: गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहे. मात्र, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस मोदींचा पराभव कसा करणार? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. काँग्रेसचा पुढचा प्रमुख कोण असेल याबाबत सध्या कोणतेही स्पष्ट संकेत नसल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे. खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, आता काँग्रेसचे बहुतांश 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, असे सोनिया गांधींसह नेत्यांचे मत आहे. मात्र, यावर राहुल गांधी यांच्या ‘हो’ची प्रतीक्षा आहे. एनडीटीव्हीने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षपदाची भूमिका राहुल गांधी यांनी स्वाकारावी यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आले नाही. 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पराभव दिला होता. सोनिया गांधी यांनीही प्रकृतीचे कारण देत पक्षाध्यक्षपदाची खुर्ची पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे आता सर्वांचे लक्ष प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर केंद्रित झाले आहे. कारण 136 वर्षे जुन्या संघटनेतील बहुतांश सदस्यांना अजूनही गांधी कुटुंबातील सदस्याने पक्षाचे नेतृत्व करावे अशी इच्छा आहे. मात्र, या वर्षी प्रियंका गांधी यांचा रेकॉर्ड उत्तर प्रदेश निवडणुकीत खराब झाला असून अनेकांच्या तो मनात आहे. एकमत नसताना रविवारपासून (21 ऑगस्ट) सुरू होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पक्षाने अद्याप अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. काँग्रेसचे दिग्गज नेते भक्त चरण दास यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “होय, त्यांनी (राहुल गांधी) म्हटले आहे की त्यांना स्वारस्य नाही. मात्र, आम्ही त्यांच्यावर काम करत आहोत आणि त्यांना पदभार स्वीकारण्याची विनंती करत आहोत. त्यांना सांगावं लागेल की, ते पद घेणार नसेल तर या खुर्चीवर कोण बसणार?

देवेंद्र फडणवीसांची ‘शोले’ स्टाईल फटकेबाजी; ‘कितने आदमी थे?..50 निकल गए’ म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा

मात्र, केंद्र सरकारविरोधात काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. सप्टेंबरमध्ये ते एका विशाल रॅलीला संबोधित करणार आहेत आणि कन्याकुमारी येथून ‘भारत जोडी यात्रा’ सुरू करणार आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा म्हणाले, “होय, आम्ही रॅलीचे आयोजन करत आहोत आणि त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील. पक्षाध्यक्षपदाच्या निवडीबाबत आम्ही ठामपणे काहीही सांगू शकत नाही. काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांपासून नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत आहे. पक्षाच्या मोठ्या पराभवामुळे तसेच हाय-प्रोफाइल नेत्यांच्या बाहेर पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मार्चमध्ये, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती, जिथे त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना केलेल्या भाषणात राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. मात्र, निवडणुकीपर्यंत राहण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतर, मे महिन्यात उदयपूर येथे पक्षाच्या मेगा मीटिंगमध्ये (काँग्रेस चिंतन शिबीर) काँग्रेसने नवीन प्रमुख निवडण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात