नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 10 मे : सत्तेसाठी राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. भंडारा जिल्हा परिषदेत (bhandara zp election) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चक्क काँग्रेस (congress) आणि भाजपने (bjp) युती केल्याचे समोर आले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या (congress and bjp alliance) एका गटाच्या या युतीमुळे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. तर उपाध्यक्ष भाजपला मिळाले आहे. पण आजपर्यंत मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसला आहे. भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली असून काँग्रेसचे अध्यक्ष तर भाजपचे उपाध्यक्ष झाला आहे. काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असून उपाध्यक्षपदी भाजपचे संदीप टाले यांची निवड झालेली आहे. ( ‘मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या’, रवी राणांचा गंभीर आरोप ) अध्यक्ष उपाध्यक्ष यांना 27-27 मते पडले आहेत. तर भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवत सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या 12 पैकी पाच मते हे चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात फुटलेली आहेत. भंडाऱ्यात भाजप आणि काँग्रेसन हातमिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादीला एकटे पाड़ले आहे. विशेष म्हणजे, 52 सदस्य जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस पक्षाला 21 जागा आणि भाजपला 12 जागा तर राष्ट्रवादीला 13 जागा मिळाल्या आहे. तर तीन अपक्ष, एक जागा शिवसेना, एक जागा वंचित आणि एक बीएसपी पक्षाला जागा मिळालेली आहे. मॅजिक फिगर 27 असल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी 21 जागा मिळालेल्या काँग्रेस पक्ष प्रबल दावेदार होता. ( मेहुणीसोबतच राहत होता भावोजी! दुसऱ्या पत्नीच्या भावाने चाकू भोसकून केली हत्या ) काँग्रेस आपल्या परंपरागत मित्राला राष्ट्रवादीलासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल असे मानले जात होते. पण पंचायत समिती निवडणुकीत सर्व समीकरण बदलून गेले. नाराज राष्ट्रवादीने आपल्यावर मागील कालावधीत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी भाजपसोबत वेगळी चूल मांडली. यामुळे काँग्रेस जिल्ह्यात एकटी पडली होती. आता पंचायत समिती प्रमाणे जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी भाजपसोबत सत्ता स्थापन करेल असे वाटले जात असताना भाजपचे चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात एक गट काँग्रेसला मिळाला. त्यामुळे सत्तेची समीकरण बदलले आणि काँग्रेस-भाजपची युती झाली. त्यामुळे राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची मदत घेतली तसंच काँग्रेसने ही सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची मदत घेतल्याने आता या अभद्र युतीची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. भंडारा जिल्हा परिषेद पक्षीय बलाबल काँग्रेस - 21 राष्ट्रवादी काँग्रेस -13 भाजप -12 बसपा -1 शिवसेना -1 वंचित- 1 इतर - 3
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.