जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बसमध्येच कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी; परभणीतील घटनेचा VIDEO

बसमध्येच कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी; परभणीतील घटनेचा VIDEO

बसमध्येच कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी; परभणीतील घटनेचा VIDEO

अगोदरच्या स्टॉपला का उतरली नाही, असं म्हणून एसटीच्या महिला वाहकाने प्रवासी महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गंगाखेड येथून राणी सावरगावकडे जात असलेल्या बसमध्ये ही महिला बसली होती

  • -MIN READ Parbhani,Maharashtra
  • Last Updated :

परभणी 25 सप्टेंबर : परभणीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अगोदरच्या स्टॉपला का उतरली नाही यावरुन महिला वाहक आणि महिला प्रवाशामध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघींची हाणामारी सुरू झाली. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून घटना परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव येथील आहे. Beed : हिटर वापरताय? एक चूक जीवावर बेतली, बीडमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू यामध्ये महिला वाहक महिला प्रवाशाच्या केसाला धरून ओढत असल्याचं दिसून येतं. ही घटना परभणीच्या राणीसावरगाव येथे घडली आहे. दरम्यान याप्रकरणी कोणीही तक्रार दिली नसल्याने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

जाहिरात

अगोदरच्या स्टॉपला का उतरली नाही, असं म्हणून एसटीच्या महिला वाहकाने प्रवासी महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गंगाखेड येथून राणी सावरगावकडे जात असलेल्या बसमध्ये ही महिला बसली होती. गावांमधील पहिल्या स्टॉपवर तू का उतरली नाही? असं म्हटल्याने या दोघींचं भांडण सुरू झालं. रस्त्यावरच तरुणाची दगडाने ठेचून हत्या; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद या वादाचं पुढे हाणामारीत रुपांतर झालं. वाहक महिलेनं प्रवासी महिलेचे केस ओढून तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ गाडीतील अन्य प्रवाशांनी चित्रित केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोन्ही महिलांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. परंतु प्रवासी महिलेनं सांगितलं की वाहक महिलेनं तिला केस ओढून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात