पुणे 25 सप्टेंबर : पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील दवा बाजार परिसरामध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. पुणे हादरलं! नवरा-बायकोचं भांडण पाहून ओरडली 8 वर्षांची मुलगी, पित्याने केलं भयानक कृत्य सागर कांबळे असं मृत तरुणाचं नाव आहे. सागर कांबळे याच्या डोक्यावर दगडाने वार करून काही अज्ञात मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली आहे. चिंचवड भागातील कुणाल प्लाझा या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स जवळ सागर कांबळे या तरुणाची दोन आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली आहे.
एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील दवा बाजार परिसरामध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. pic.twitter.com/KAfHmuIA35
— News18Lokmat (@News18lokmat) September 25, 2022
सागर कांबळेच्या हत्येची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. मात्र मारेकऱ्यांनी सागर कांबळेची हत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. सागर कांबळेच्या हत्या प्रकरणात निगडी पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकऱ्यांच्या शोध निगडी पोलीस घेत आहेत. VIDEO : पुण्यातली अतिशय वेदनादायी घटना, आईने पोटच्या लेकराला ट्र्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली जाताना पाहिलं शनिवारीच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात पती पत्नीचा वाद सुरू असताना एकाने आपल्याच आठ वर्षांच्या मुलीवर गोळी झाडली. कौटुंबिक कलहातून घडलेल्या या घटनेने शहर हादरलं. पत्नीशी झालेल्या वादानंतर या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर रिव्हॉल्व्हर रोखली होती. यावेळी आपल्या आईची अवस्था पाहून मुलीने आरडाओरडा सुरू केल्यावर आरोपीने हे धक्कादायक कृत्य केलं. पांडुरंग उभे असे आरोपीचे नाव आहे.