जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed : हिटर वापरताय? एक चूक जीवावर बेतली, बीडमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Beed : हिटर वापरताय? एक चूक जीवावर बेतली, बीडमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Beed : हिटर वापरताय? एक चूक जीवावर बेतली, बीडमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू

हिटरमधील उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगावर पडल्याने, गंभीर भाजलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 25 सप्टेंबर : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिटरमधील उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगावर पडल्याने, गंभीर भाजलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या पिंपळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. उषा रंजीत सुरवसे (वय 31) रा. पिंपळगाव ता. माजलगाव असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

उषा सुरवसे ह्या रात्री 10 च्या सुमारास झोपताना हिटर सुरू करून झोपल्या होत्या. दरम्यान रात्रभर हिटर सुरु असल्याने तो गरम होऊन प्लॅस्टीकच्या टाकीतील पाणी उकळत होते. दरम्यान त्या टाकीची क्षमता संपल्याने ती टाकी फुटली. यावेळी उषा ह्या त्या टाकीला लागून झोपल्या असल्याने त्यांच्या अंगावर पाणी पडले.

हे ही वाचा :  Video : अखेर बीडमध्ये धावली रेल्वे!, काय म्हणतात सामान्य नागरिक? पाहा स्पेशल रिपोर्ट

यामध्ये त्या गंभीररित्या भाजल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. जखमी उषा सुरवसे यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान मयत उषा सुरवसे यांच्या पश्चात पती, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

देवीची ज्योत घेऊन जाताना दोघांवर काळाचा घाला

नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. पण त्याआधीच बीडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेवून गावी निघालेल्या दुचाकीवरील दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन तरुणांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.बीड आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण इथं ही घटना घडली. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव खिलारे अशी मृतांची नावे आहेत. दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची प्रथा आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Nanded Accident : नांदेडमध्ये कामगारांवर काळाचा घाला, अपघातात 5 जण जागीच ठार तर 5 गंभीर जखमी

यासाठी गावातील 50 तरुण भाविक तुळजापूर इथं शनिवारी सकाळी निघाले होते. यातील एका दुचाकीला रात्री येरमाळा येथे रात्री 9 वाजेच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed , beed news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात