मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून काढून घेतला चार्ज, लवकरच निघणार जाहिरात

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून काढून घेतला चार्ज, लवकरच निघणार जाहिरात

तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

नागपूर, 10 जुलै: नागपूर महानगरपालिकेत आयुक्त विरुद्ध महापौर असा आखाडा रंगला आहे. त्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दुसरीकडे, तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेला नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदाचा चार्ज काढून घेण्यात आला आहे.

हेही वाचा...सांगली हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी सीईओपदी महेश मोरोने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, महेश मोरोने यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावे लागणार आहे. पुढील काही दिवसांत नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सीईओ (पूर्ण वेळ) नेमण्यासाठी जाहिरात काढणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.

महापौरांनी दाखल केला अर्ज...

महापौर संदीप जोशी यांचा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध अर्ज दाखल केला आहे. या अर्जात स्मार्ट सिटीतील घोटाळ्याबाबत तुकाराम मुंढेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांच्यासह आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असा आरोप जोशी यांनी केला असून त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा...'विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होताच मात्र त्याच्यापेक्षाही शातिर निघाले पोलिस'

दरम्यान, 9 जुलै रोजी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहे. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकवरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 15 दिवसांत त्यांना यावर उत्तर द्यायचं आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील श्रीरंग भांडारकर यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 10, 2020, 3:47 PM IST

ताज्या बातम्या