जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होताच मात्र त्याच्यापेक्षाही शातिर निघाले पोलिस'

'विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होताच मात्र त्याच्यापेक्षाही शातिर निघाले पोलिस'

'विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होताच मात्र त्याच्यापेक्षाही शातिर निघाले पोलिस'

विकास दुबेचं एन्काउंटर बनावट की खरं? यावरून देशात राजकारण सुरू झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जुलै: उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर विकास दुबे याचा एन्काऊंटर केला आहे. पोलिसांच्या ज्या प्रकारे विकास दुबे याचा एन्काउंटर केला, त्यावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काहींनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं आहे तर काहींनी पोलिसांची कारवाई पूर्वनियोजित असल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा… हा तर जीवाशी खेळ! कोरोनानं थैमान घातलं असताना मुलांना शाळेत बोलावून पुस्तकं वाटप विकास दुबेचं एन्काउंटर बनावट की खरं? यावरून देशात राजकारण सुरू झालं आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी प्रतिक्रिया दिली आहे. विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होताच. मात्र, पोलिस त्याच्यापेक्षाही शातिर निघाले. विकास दुबेच्या माध्यामातून अनेक नावं, त्यांची कामं समोर येण्याची अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केल्यानं आता धागाच लिंकच नष्ट झाली आहे.

जाहिरात

दरम्यान, 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला कानपूरमध्ये घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातामध्ये विकास दुबे जखमी झाला. जीपमध्ये मध्यभागी बसलेला विकासनं पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांना बचावासाठी गोळीबार करावा लागला. यादरम्यान विकास दुबेचा एन्काउंटर करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. एन्काउंटर स्पेशलिस्टनं केलं समर्थन… दुसरीकडे, मुंबई पोलिसात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचे एन्काउंटर होणे हे साहजिकच आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे, असं मत प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केले. ‘जेव्हा कधी एखाद्या आरोपीचे एन्काउंटर होते, तेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातात. पण, या कुख्यात गुंडाने 8 पोलिसांची हत्या केली तेव्हा कुणीही मानवधिकार आयोगाकडे जात नाही. अशा आरोपींसोबत जे घडले ते बरोबर होते.’ असंही प्रदीप शर्मा म्हणाले. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप ‘विकास दुबेला अटक झाली त्यानंतर आम्ही याच बातमीची वाट पहात होतो…जे झालं ते पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा बदला घेतात. याच क्षणाची वाट पाहात होतो. याचं राजकारण नको करायला,’ अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काउंटरवर भाष्य केलं आहे. मात्र यावेळी संजय राऊत यांनी एक आरोपही केला आहे. हेही वाचा… रुग्णांचा लूट! कोरोनाच्या महामारीत पुण्यात उघडकीस आला धक्कादायक प्रकार ‘विकास दुबे या सारखी माणसं तयार केली जातात. ती राजकारण्यांकडून निवडणुका जिंकण्यासाठी तयार केली जातात. खंडण्या गोळा करण्यासाठी… काही राज्यात हे सरू आहे. विकास दुबे हा देखील राजकारणातच होता. गुन्हेगार राजकारणात येत आहेत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात