मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यातील 7 कारखान्यांना आयुक्तांचा दणका; या नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत

राज्यातील 7 कारखान्यांना आयुक्तांचा दणका; या नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत

आता राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नोटीस बजावल्या आहेत. 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली आहे

पुणे 29 जुलै : राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. तर, काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. दरम्यान आता राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नोटीस बजावल्या आहेत. 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येतं. साखर आयुक्तांनी राज्यभरातील सात साखर कारखान्यांना दणका दिला असल्याची माहिती समोर आली आहे. Akola : आरोग्य केंद्रालाच ‘उपचाराची’ गरज; रुग्णांच्या त्रासात भर, पाहा VIDEO नोटीस बजावण्यात आलेले साखर कारखाने- 1) सोलापूर - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर - आरआरसी रक्कम ३६७४.९० लाख ( संबंधित राजकीय नेते - कल्याणराव काळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) 2) पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भोर- आरआरसी रक्म २५९१.६९ लाख ( संबंधित राजकीय नेते - आमदार संग्राम थोपटे - काँग्रेस) 3) बीड - अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई आरआरसी रक्कम ८१४.१५ ( संबंधित राजकीय नेते - माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) 4) बीड - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी - आरआरसीसी रक्कम - ४६१५.७५ लाख ( संबंधित राजकीय नेते - माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप) 5) उस्मानाबाद - जयलक्ष्मी शुगर प्रो.नितळी - आरआरसी रक्कम - ३४०.६९ लाख ( संबंधित राजकीय नेते - विजयकुमार दांडनाईक, भाजप) 6) सातारा - किसनवीर ससाका भुईंज, सातारा - आरआरसी रक्कम - ४११.९१ लाख ( संबंधित राजकीय नेते - आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) 7) अहमदनगर - साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर - आरआरसी रक्कम -२०५४.५० लाख - ( संबंधित राजकीय नेते - आमदार बबनराव पाचपुते,भाजप)
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Pankaja munde, Sugarcane in maharashtra

पुढील बातम्या