Home /News /maharashtra /

मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय झालं बोलणं? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय झालं बोलणं? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

मराठा आरक्षणानाच्या मुद्यावर बोलताना काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

    मुंबई, 13 सप्टेंबर: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मी घरीच बसून काम करत आहे, असा आरोप होत आहे. पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणं गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे. आणि काम होत आहे. आरोप करून काहीही फायदा नाही., असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. हेही वाचा...कंगना रणौतच्या अडचणीत वाढ! मुंबई महापालिकेनं दिला आणखी एक जबरदस्त झटका महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासोबत असून आंदोलन करू नका, अफवांना बळी पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सरकारसोबत आहोत, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणानाच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यानी सांगितलं की, मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने बाजू मांडली. पण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हे अनाकलनिय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहे. ज्या मराठा संघटना आहे, जी लोकं आहे त्यांच्याशी बोलत आहे. अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशी बोलणे सुरू आहे. मराठा आरक्षणाची तुमची जी भावना आहे, तीच आमचीही भावना आहे. तुमच्या मागण्या या राज्य सरकारच्या मागण्या आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार कोर्टात लढा देत आहे. मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रणनीती आखत आहे. सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आंदोलन काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देणे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठा समाजाने अफवांना बळी पडू नये, कुणाच्या बोलण्यात येऊ नये. गैरसमज पसरवू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले. आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री? - महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ आहे. पण, याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे. - जागतिक संघटनेनं इशारा दिला आहे, कोरोनाची लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे - महाराष्ट्रात येत्या 15 तारखेपासून मोहिम राबवतोय. या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी जात धर्म हे सोडून सहभागी झाले पाहिजे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करत आहोत. - 12 कोटी जनतेची आरोग्य तपासणी करणे, जरा अवघड काम आहे. पण तरीही प्रत्येक घराची दोनदा चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची टीम येईल. जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यावी - घराघरात जाऊन 50 ते 55 वयापेक्षा जास्त व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हल तपासणार आहे, यात काही दोष आढळून आला तर आरोग्य टीम इलाज सुरू करेल. हेही वाचा...ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप? - सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे - घरी आल्यावर बुट बाहेर काढणे, हात-पाय धुणे, कपडे बाहेर काढून ठेवणे आणि त्यानंतर घरात प्रवेश करावा - समोरासमोर बोलण्याचे टाळा, मास्कचा वापर करा - लोकल सेवा सुरू केली आहे, त्यात लवकरच वाढ करणार आहोत, - जिम रेस्टॉरंट, लवकरच सुरू करणार आहोत. - इतरांसमोर जेवताना समोरासमोर बसून जेवू नका, जेवताना छोट्या छोट्या वाट्या घ्या.. - पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका, लोकांनी सर्व नियम पाळले तर लॉकडाउन परत करण्याचे वेळ येणार नाही ही अपेक्षा ठेवतो. - हे संकट शेवटचं असेल असं नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण लढा देत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Udhav thackarey

    पुढील बातम्या