मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कंगना रणौतच्या अडचणीत वाढ! मुंबई महापालिकेनं दिला आणखी एक जबरदस्त झटका

कंगना रणौतच्या अडचणीत वाढ! मुंबई महापालिकेनं दिला आणखी एक जबरदस्त झटका

बीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.

बीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे मुंबई महापालिकेनं (BMC) कंगनाला आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे.

मुंबई, 13 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने (kangana ranaut) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात (uddhav thackeray) केलेल्या नव्या ट्वीटमुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनं (BMC) कंगनाला आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. कंगना रणौतच्या पाली हिल येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर बीएमसीनं बुलडोझर फिरवला होता. 24 तासांच्या नोटिशीनंतर बीएमसीनं ही कारवाई केली होती. त्यानंतर आता बीएमसीनं कंगनाच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामावरून नोटिस बजावली आहे.

हेही वाचा.....तर नाईलाजाने आम्हाला स्वतः हून मंदिरे उघडावी लागतील, 'आध्यात्मिक आघाडी'चा मुख्यमंत्र्यांना इशारा

बीएमसीच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कंगना हिनं खार येथील आपल्या फ्लॅटमध्ये बीएमसीचे नियम धाब्यावर ठेऊन बांधकाम केलं आहे. तिनं अक्षरश: नियमांचा पायमल्ली केली आहे. दरम्यान, कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर बीएमसीनं केलेल्या कारवाईवर 25 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

मुंबईताल खार वेस्ट येथील DB Breeze (Orchid Breeze)च्या 16 नंबर रोडवरील एका बिल्डिंगमध्ये कंगना रणौतचा एक फ्लॅट आहे. बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. विशेष म्हणजे पाचव्या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट 797 sqft + दुसरा फ्लॅट 711sqft आणि तिसरा फ्लॅट 459 sqft आहे. तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. 8 मार्च 2013 रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती.

कंगना हिनं फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिनं फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

तक्रार मिळाल्यानंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला BMC under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटिस बजावण्यात आली होती. या नोटिशीला 27 मार्च 2014 रोजी बीएमसीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.

First published:
top videos

    Tags: BMC, Bollywood, Kangana ranaut