मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सीएनजी भरल्यावर निघाली स्कूल व्हॅन अन् धावताना लगेचच घेतला पेट, चालकाची उडी तर...; पाहा VIDEO

सीएनजी भरल्यावर निघाली स्कूल व्हॅन अन् धावताना लगेचच घेतला पेट, चालकाची उडी तर...; पाहा VIDEO

ही घटना नवीन पनवेल उड्डाण पुलाखालच्या रस्त्यावर घडली.

ही घटना नवीन पनवेल उड्डाण पुलाखालच्या रस्त्यावर घडली.

ही घटना नवीन पनवेल उड्डाण पुलाखालच्या रस्त्यावर घडली.

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

रायगड, 5 जुलै : सीएनजी किट असलेल्या कारने (CNG gas car) रस्त्यावर धावताना पेट घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना पनवेलमधून (Panvel CNG gas car) समोर आली आहे. गाडीमध्ये सीएनजी गॅस भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर निघाल्यावर काही अंतर पुढे गेलेल्या स्कूल व्हॅनने अचानकपणे पेट (School CNG gas fire) घेतला. ही घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली.

काय आहे संपूर्ण घटना -

सध्या सीएनजी गॅसच्या गाड्यांचा वापर वाढलेला पाहायला मिळतो आहे. पेट्रोल डिझेलचे दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या इंधनाचे दर गगनाला भिडल्याने अनेक जण आजकाल सीएनजी गाड्यांना प्राधान्य देत आहेत. मात्र, सीएनजी किट असलेल्या कारने रस्त्यावर धावताना पेट घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशी एक घटना समोर आली आहे. ही घटना नवीन पनवेल उड्डाण पुलाखालच्या रस्त्यावर घडली.

नवीन पनवेल उड्डाण पुलाखाली असलेल्या कांडपिळे सीएनजी पंपामध्ये आज दुपारी पाऊणे तीनच्या सुमारास स्कूल व्हॅन गाडी घेऊन चालक गॅस भरण्यासाठी गेला. गॅस भरल्यानंतर सदर गाडी बाहेर काढून चालक थोडा पुढे गेला. मात्र, यावेळी अचानकपणे गाडीने पेट घेतला. यामुळे एकच धावपळ उडाली.

हेही वाचा - घरासमोर खेळणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने मारली झडप, जंगलात नेऊन केले ठार, नाशिक हादरलं

यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी धाव घेतली. तसेच आग्निशमक दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. या लागलेल्या आगीमध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. सुदैवाने शाळेतली मुले बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर चालकही बाहेर पडल्याने त्यालाही दुखापत झाली नाही. मात्र, गाडी पूर्णपणे जळाली असून मोठे नुकसान झाले आहे.

First published:

Tags: Burning car, Car, Panvel