Home /News /maharashtra /

घरासमोर खेळणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने मारली झडप, जंगलात नेऊन केले ठार, नाशिक हादरलं

घरासमोर खेळणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने मारली झडप, जंगलात नेऊन केले ठार, नाशिक हादरलं

 आपल्या लेकीचा मृतदेह पाहुन वाघ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला.

आपल्या लेकीचा मृतदेह पाहुन वाघ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला.

आपल्या लेकीचा मृतदेह पाहुन वाघ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला.

    नाशिक, ०५ जुलै : नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याने एका आठ वर्षांच्या मुलीवर (Leopard attacks ) हल्ला केला आणि जंगलात नेऊन तिला ठार मारलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या धुमोडी गावात ही घटना घडली. सोमवारी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास बिबट्याने एका ८ वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. रुची एकनाथ वाघ (वय ८) असं या मुलीचे नाव आहे. बिबट्याने जबड्यात धरून या मुलीला जंगलात नेले. सुमारे साडे चार तास वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी रात्री शोधकार्य केलं. अखेरीस अकरा वाजेच्या सुमारास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात बलिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. तालुक्यातील धुमाडा गावच्या शिवारात असलेल्या वाघ कुटुंबीय वास्तव्यास आहे. घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने रुची एकनाथ वाघ हिच्यावर झडप घातली. त्यानंतर काही कळायच्या आता बिबट्याने जबड्यात धरून रुचीला वेगात जंगलात घेऊन गेला. बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे धाव घेतली. गावकऱ्यांनी याची माहिती तातडीने वन कर्मचाऱ्यांना दिली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. (JOB ALERT: कोणतीही परीक्षा नाही; थेट होईल मुलाखत; ESIC मध्ये लाखो रुपये पगार) वन परिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे हेदेखील पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अंजनेरी, मुळेगावसह नाशिकचे वन कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथकाला घटनास्थळी त्यांनी पाचारण केले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी सुमारे चार ते साडे चार तास शोध घेतला. यानंतर झाडांच्या मध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला. अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत या मुलीचा मृतदेह हाती लागला. बिबट्याने या चिमुरडीचा गळा आणि एक हात खाल्ला होता. वनकर्मचाऱ्यांनी या मुलीचा मृतदेह गावात आणला. आपल्या लेकीचा मृतदेह पाहुन वाघ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला. परिसरात वनविभागाने पिंजरे लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या