Home /News /maharashtra /

राज्यात एकाच आठवड्यात 4 लाख रुग्णांची भर, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत माहितीसमोर

राज्यात एकाच आठवड्यात 4 लाख रुग्णांची भर, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत माहितीसमोर

 2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

रेमडेसीवीर, लसीकरण या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलं आहे. सोमवारीही मुख्यमंत्री बैठक घेणार असून त्यानंतर अंतिम निर्णय समोर येण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 11 एप्रिल : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे लॉकडाऊन (Maharashtra lockdown) लागण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी रविवारी टास्क फोर्सबरोबर बैठक घेतली. यावेळी राज्यात  4 एप्रिल ते 10 एप्रिल असेे एका आठवड्यात 4 लाख नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली.  त्याचबरोबर राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीनं वाढवण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले. रेमडेसीवीर, लसीकरण या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलं आहे. सोमवारीही मुख्यमंत्री बैठक घेणार असून त्यानंतर अंतिम निर्णय समोर येण्याची शक्यता आहे. राज्यातली कोरोनाची स्थिती पाहता भविष्यात नेमके काय पाऊल उचलायचे याच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्सबरोबर बैठक घेत चर्चा केली. यात प्रामुख्यानं ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसीवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे यावर सविस्तर चर्चा झाली. IPL 2021 : ऑस्ट्रेलियातल्या संघर्षानंतर पृथ्वी त्यांच्याकडे गेला आणि इतिहास घडला कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, जनजागृती केली. पण त्याबरोबरच आता कार्यालयीन वेळांमध्ये बदल करणं, वर्क फ्रॉम होमवर भर देणं, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणं अशा अनेक उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लक्षणे नसलेले मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवत आहेत. काही लोकांमुळं सर्वांना त्रास होतोय. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ऑक्सिजन, लसीकरण आणि रेमडेसीवीर लसीकरणात राज्य आघाडीवर असलं तरी वेग आणखी वाढवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी ते उपयुक्त ठरेल असं मुख्यमंत्री म्हणाले. पण सध्या काही काळासाठी तरी कडक निर्बंध लावावेच लागतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. रेमडेसीवीरचा अवाजवी वापर थांबवणं गरजेचं असल्याचंही मत टास्क फोर्सनं मांडलं. बिग बॉस फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला; नेमकं झालं तरी काय, पाहा VIDEO त्यावर रेमडेसीवीरचा पुरवठा आता थेट रुग्णालयाला देऊन डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्राच्या समन्वयानं पुरवठा वाढविणं अशी कार्यवाही झाल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. शेजारच्या राज्यातून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असेल तर तिथून तातडीनं मागवण्यावरही चर्चा झाली. एका आठवड्यात 4 लाख रुग्ण डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल ते 10 एप्रिल असे एका आठवड्यात 4 लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर या काळात 1982 मृत्यू झाले. सध्या मृत्यू दर 0.5 टक्के इतका असून तो वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बेड्स सध्या 20 हजार 250 आयसीयू बेड्स पैकी 75 टक्के भरले असून 67 हजार ऑक्सिजन बेड्स पैकी 40 टक्के भरले आहेत. जवळपास 11 ते 12 जिल्ह्यांत बेड्स उपलब्ध नसल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. नंदुरबारमध्ये रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्सची व्यवस्था केल्याचंही त्यांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या