Home /News /entertainment /

बिग बॉस फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला; नेमकं झालं तरी काय, पाहा VIDEO

बिग बॉस फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला; नेमकं झालं तरी काय, पाहा VIDEO

व्हिडीओमध्ये एक मोर अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशीवर (Digangana Suryavanshi) हल्ला करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. दिगांगना 'बिग बॉस' शोची (Bigg Boss) एक्स कंटेस्टेंट आहे.

  नवी दिल्ली, 11 एप्रिल : आपल्या आसपासचे प्राणी, पक्षी, जीव अनेकदा माणसाच्या वागण्यामुळे घाबरतात. तसंच, कधीतरी अतिशय शांत दिसणाऱ्या प्राण्याचे अनेक मजेशीर, कधी घाबरवणारे कारनामेही कॅमेरात कैद होतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मोर अभिनेत्री दिगांगना सुर्यवंशीवर (Digangana Suryavanshi) हल्ला करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. दिगांगना 'बिग बॉस' शोची (Bigg Boss) एक्स कंटेस्टेंट आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री अतिशय शांतपणे, मोराला काहीही न करत त्याची सुंदरता न्याहाळताना दिसतेय. परंतु तिचं असं पाहणं मोराच्या पसंतीच पडलेलं दिसत नाही. ती मोराला पाहत असतानाच कोणतीही कल्पना नसताना, मोर अभिनेत्रीवर हल्ला करतो. हा व्हिडीओ फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दिगांगनाला मोराला जवळून पाहणं चांगलंच महागात पडलं. दिगांगना मोराच्या अगदी जवळ उभी असते. मोरही अगदी शांतपणे फिरताना दिसतोय. अभिनेत्री मोराच्या काहीशी जवळ जात असतानाच मोराने उडी मारुन तिच्यावर हल्ला केला. दिगांगनाने या व्हायरल व्हिडीओवर कमेंटही केली आहे.

  (वाचा - 'अंगुरी भाभी' आहे 14 वर्षाच्या मुलीची आई; अवघ्या 19 व्या वर्षी झालं होतं लग्न)

  या सर्व प्रकारादरम्यान अभिनेत्रीची आईही बाजूलाच उभी असते. त्या लगेच आपल्या मुलीच्या जवळ जाऊन, मोराला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्स अनेक कमेंट करत असून सध्या अभिनेत्रीसोबत घडलेला हा प्रकार, व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Viral video.

  पुढील बातम्या