मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING: मुख्यमंत्री ठाकरे 2 तारखेनंतर घेतील लॉकडाउनबद्दल निर्णय, राजेश टोपेंनी दिले संकेत

BREAKING: मुख्यमंत्री ठाकरे 2 तारखेनंतर घेतील लॉकडाउनबद्दल निर्णय, राजेश टोपेंनी दिले संकेत

'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधा पाहून जिल्हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे'

'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधा पाहून जिल्हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे'

'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधा पाहून जिल्हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे'

जालना, 28 मार्च : महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा थैमान घातले आहे. औरंगाबाद (Aurangabad), नांदेड, नागपूर (Nagpur), बीड, अमरावतीमध्ये मिनी लॉकडाउन लावण्यात आला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) 2 एप्रिलनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउनचा (Lockdown) निर्णय घेतली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे.

'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधा पाहून जिल्हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये 5 दिवस तर काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यु लावला आहे. मात्र ICMR च्या नियमाप्रमाणे किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असतो. तरच कोरोनाची साखळी तुटेल. कोरोना रुग्ण बरा होण्याला 15 दिवस लागतात, अशी माहिती टोपे यांनी दिली.

Nissan च्या या SUV वर 95 हजारांपर्यंतची घसघशीत सूट; जाणून घ्या काय आहे ऑफर

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नजर ठेवून आहे. सर्व परिस्थितीचा ते 2 एप्रिल रोजी आढावा घेणार आहे.  2 तारखेनंतर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील, असं स्पष्टपणे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

केंद्राने लसीकरणाची गती वाढवण्याचा चॅलेंज आम्ही स्वीकारतो. मात्र लसीचा पुरवठा देखील वाढवावा लागणार आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त वेगाने लसीकरण सुरू आहे. सर्व पक्षांनी लसीकरण वाढवण्यास पुढाकार घ्यावा, असं आवाहनही टोपे यांनी केलं.

औरंगाबादेत एकाच दिवसात 28 जणांचा मृत्यू

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  शनिवारी रात्रीपर्यंत एकाच दिवसात 1715 नवीन रुग्णाची भर पडली तर एकाच दिवसात तब्बल 28 जणांचा मृत्यू झाला.

‘माझी सख्खी बायको गेली’ हे गाणं कसं तयार झालं? पाहा संगीतकाराचा भन्नाट किस्सा

जिल्ह्यात शनिवारी 1060 जणांना (मनपा 900, ग्रामीण 160) सु्ट्टी देण्यात आली. आजपर्यंत 60228 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1715 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77350 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1559 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First published:
top videos

    Tags: Covid-19, Lockdown, Uddhav thackarey