करून दाखवलं.. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'मुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश

करून दाखवलं.. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'मुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश

कोरोना आटोक्यात आल्याचं दिसतअसलं तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहा...

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर: 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' (my family my responsibility)  या मोहिमेमुळे आपण कोरोना संसर्ग (Coronavirus) रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी सांगितलं. डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, अशा सूचना देखील मुखमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. दिवाळीनंतर पुढचे 15 दिवस जागरुकतेचे आहे. त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पहा, असेही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा...राजकारणाची दिशा बदलणार! कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा सेनेचा इरादा

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला आणि कोविड संदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली. आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, हे वर्ल्ड वॉर आहे, असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो. इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू  मिळविण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्य विषयक खबरदारी पाळली मात्र आत्ता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्युमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. फ्ल्यु आणि कोरोनातील फरकही कळला पाहिजे.

सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या आवश्यक

सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोविड सुविधा काढून टाकू नका

महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या  सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा; त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही उणीवा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सची आढावा घ्या, कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्या पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील का हे पहा असेही ते म्हणाले.

हेही वाचा...रामदास आठवलेंची कोरोनावर मात, पत्नी मुलासह हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

काटेकोर कारवाई करा

शहरी आणि ग्रामीण भागात स्वॅब (घशातील द्राव)  संकलन केंद्रे वाढवा, चाचण्या कमी करू नका. दुसऱ्या लाटेची तयारी करा, कर्मचारी व सुविधा यांची तयारी करून ठेवा, लस डिसेंबर अखेर किंवा एप्रिलमध्ये येईल असा अंदाज आहे. मात्र तोपर्यंत मास्क, हात धुवा, सुरक्षित अंतर हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, प्रार्थना स्थळांना उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेऊ. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात. हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे, असेही ते म्हणाले.

Published by: Sandip Parolekar
First published: November 8, 2020, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading