Home /News /mumbai /

रामदास आठवलेंची कोरोनावर मात, पत्नी मुलासह हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

रामदास आठवलेंची कोरोनावर मात, पत्नी मुलासह हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

रामदास आठवले यांना 27 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कफ आणि अंगदुखीच्या तक्रारीनंतर आठवले यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती

मुंबई, 08 नोव्हेंबर : 'गो कोरोना गो'ची (Go Corona Go) घोषणा देणारे रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री  रामदास आठवले (ramdas athawale) यांनी कोरोनावर मात केली आहे. रामदास आठवले यांना पत्नी आणि मुलासह बॉम्बे हॉस्पिटलमधून (Bombay Hospital mumbai) डिस्चार्ज देण्यात आला आहे. रामदास आठवले यांना 27 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कफ आणि अंगदुखीच्या तक्रारीनंतर आठवले यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरुवातीला स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले होते. पण, प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. दुकानासमोर करायचा लघुशंका, दुकानदारांनी मिळून केलेल्या मारहाणी तरुणाचा मृत्यू त्यांच्या पत्नी सीमा आणि मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आठवले यांच्यासह दोघांनाही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर 12  दिवसांच्या उपचारानंतर आठवले कुटुंबाने कोरोनावर मात केली आहे. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अलर्ट! डेबिट, क्रेडिट कार्डाबाबत अशाप्रकारे कॉल आल्यास वेळीच व्हा सावधान, अन्यथा परंतु, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, रामदास आठवले हे काही दिवस घरीच क्वारंटाइन राहणार आहे. त्यामुळे पुढील सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहे. मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दरम्यान, मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असं आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले आहे. Gold Price: या महिन्यात 1633 रुपयांनी सोनं महागलं;धनत्रयोदशीपर्यंत किती असेल भाव मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या