मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंसोबत आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा, भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं टाळलं?

राज ठाकरेंसोबत आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा, भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं टाळलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जावून भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जावून भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जावून भेट घेतली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 1 सप्टेंबर : राज्यभरात सध्या गणशोत्सवाचा उत्साह आहे. या उत्साहादम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जावून भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरु आहे त्या सुनावणीचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागला, त्यांना शिवसेनेत राहता येणार नाही, असं कोर्टाने जाहीर केलं तर शिंदे गटाला भाजप किंवा मनसे या पक्षात सामील होण्याचा पर्याय असेल. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. गेल्या काही दिवसांमधील घडामोडी हे तेच सांगत आहेत. राज ठाकरे यांनी एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भर सभेत सडकून टीका केली आहे. त्यानंतर आता त्यांची भाजपसोबतची जवळीक वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये नेमकं काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

"सगळीकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे. एक अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतोय. गणेशोत्सावानिमित्ताने आपण एकमेकांकडे जात असतो. या निमित्तानेच आम्ही राज ठाकरे यांच्या घरी आलो आहोत. सदिच्छा भेट घेतली. त्यांचं मध्ये ऑपरेशन झालं होतं. त्यावेळी येता आलं नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांना यावेळी राजकीय प्रश्न विचारण्यात आला. या भेटीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सुरुवातीला स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं. पण त्यानंतर त्यांनी ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांच्याबद्दल चर्चा झाली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

(काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्रातून? चर्चेदरम्यान नाना पटोलेंचा मोठा खुलासा, थेट नावच सांगितलं)

"आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट झाली. खरंतर त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर येणार होतो. पण आज गणपतीच्या निमित्ताने भेट झाली. दिघे साहेबांच्या आठवणींबद्दल चर्चा झाली. आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या सानिध्यात काम केलेलं आहे. राज ठाकरेंनीदेखील बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाने राज्यात काम केलं आहे", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करणं टाळणं. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीच विधान केलं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चर्चा झालीच नसेल का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

यावेळी "एकनाथ शिंदे यांना दसरा मेळावा घेणार का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. दसरा अजून पुढे आहे. गणपती होऊद्या, नंतर आपण पुढे जाऊ", असं मुख्यमंत्री म्हणाले.

First published:

Tags: Eknath Shinde, Raj Thackeray