मुंबई, 23 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून शिवसेनेत रोज नवीन घडामोड घडत असते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्याची वीज पुरवठा खंडीत झाल्याने यातून राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर अवघ्या काही मिनीटांत २०० मिटर लांबून तात्पूरत्या स्वरूपाची त्यांच्या घरासाठी वीज पूरवठा करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांचा बंगला मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याने वीज पुरवठा कसा खंडित झाला यावर वेगळे अर्थ काढले जात आहेत. (CM Eknath Shinde)
मुंबई महापालिकेच्या बेस्ट बसची केबल जळाल्याने बंगल्याची बत्ती झाली होती. दरम्यान बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हे काम ज्या ठिकाणी सुरू त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांचा बंगला आहे. यामुळे त्यांच्या बंगल्यासमोरच 5 फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून 3 लागण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने अनेक चर्चांना ऊधाण आले आहे. यामुळे यातून नवा कोणता राजकीय संघर्ष उफाळून येतो का हे पाहणे महत्वाचे असेल.
हे ही वाचा : रत्नागिरीत शिवसेना VS शिवसेना; बॅनरवरुन दोन गटातील वाद चिघळणार? मोठा पोलीस बंदोबस्त
शिंदे सरकारकडून महाविकास आघाडीतील कामांना स्थगिती
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. यानंतर शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तसंच अनेक ठिकाणचा निधीही रोखला आहे. यापाठोपाठ आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नव्या सरकारने आता आणखी एक नवा निर्णय घेत राज्यातील 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा : Mumbai: वाढत्या महागाईत CNG ची झळ; बँकेचे हप्ते कसे फेडणार? रिक्षाचालकांचा सवाल, VIDEO
राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दाखल झालेले गुन्हे केंद्रीय यंत्रणांकडे वर्ग केले जात आहेत. आता राज्यातील आणखी 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिसांना दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Mumbai, Mumbai muncipal corporation, Shiv Sena (Political Party)