मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai: वाढत्या महागाईत CNG ची झळ; बँकेचे हप्ते कसे फेडणार? रिक्षाचालकांचा सवाल, VIDEO

Mumbai: वाढत्या महागाईत CNG ची झळ; बँकेचे हप्ते कसे फेडणार? रिक्षाचालकांचा सवाल, VIDEO

सीएनजी गॅस महागल्याने रिक्षा ( Auto driver ) चालकांना याचा मोठा फटका बसला असून त्यांच्या उदरनिर्वाहवर परिणाम झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जुलै ; मुंबई शहरात लाखोंच्या संख्येने रिक्षा आहेत. रिक्षातून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करून असंख्य रिक्षाचालक स्वतःचा जीवन चरितार्थ चालवत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यात महागाई ( inflation) प्रचंड वाढली आहे. पेट्रोल ( Petrol ), डिझेल ( Diesel ), सीएनजी गॅसने ( CNG Gas)  तर कहरच केला आहे. सीएनजी गॅस महागल्याने रिक्षा ( Auto driver ) चालकांना याचा मोठा फटका बसला असून त्यांच्या उदरनिर्वाहवर परिणाम झाला आहे. तीन महिन्यात दुपटीने सीएनजी गॅस महागल्याने रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच सीएनजी गॅस दरवाढी बाबत रिक्षा चालकांचे काय म्हणणे आहे जाणून घेऊया या रिपोर्ट मधून… 

धडक युनियनचे सचिव मारुती भगवद गिडे हे अनेक वर्षापासून बोरीवलीत रिक्षा चालवतात. रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. प्रवाशांच्या भाड्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःचा जीवनाचा गाडा चालवत असतात. पण ते वाढत्या महागाईने हैराण आहेत. मारुती गिडे म्हणतात की, "मी गेले अनेक वर्षापासून रिक्षा चालवत आहे. तीन  महिन्यापूर्वी सीएनजी गॅसचा दर हा 50 रूपये इतका होता. मात्र, आता दर  80 रुपयांवर पोहचला आहे आणि मीटरची वाढ तीन रूपये इतकीच आहे. कस चालणार आमचं  जीवन. तीन महिन्यात सीएनजी 30 रुपयांनी वाढला. मी रिक्षा बँकेकडून कर्ज घेऊन घेतली आहे. मात्र, कर्जाचे हफ्ते मी सध्या फेडू शकत नाही. कर्जाचे हफ्ते फेडायचे कसे? असा प्रश्न समोर निर्माण झाला आहे. इतकी अवस्था वाईट झाली आहे. कोरोनामध्ये तर मी हफ्ते फेडू शकलो नाही. बँकेने रिक्षा उचलून नेली होती. मात्र, व्याजावर पैसे घेऊन रिक्षा सोडवून आणली आहे".

हेही वाचा- Wardha: शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरू; 'या' कागदपत्रांसह लगेच करा अर्ज, VIDEO

जीवनाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण

मुंबईसह उपनगरात रिक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गॅस महागल्याने पहिल्यासारखे पैसे मिळणे देखिल कठीण होऊन बसले आहे. जीवनाचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचे शिक्षण, घरखर्च इत्यादीचा ताण हा रिक्षा चालकांवर येत आहे. रिक्षाचे हफ्ते फिटत नसल्याने बँका नोटिसा बजावात असल्याने रिक्षा चालक तणावात आलेले आहेत. 

अरविंद मोरे गेले अनेक वर्षे बोरीवलीत रिक्षा चालवून स्वतःचा घरचा उदरनिर्वाह करतात. अरविंद म्हणाले, "की सीएनजीचे दर वाढले. गेल्या तीन महिन्यात 30 रुपयांनी दर वाढले. करणार काय 500 रूपये धंदा होतो. त्यात 300 रूपये गॅसला जातात राहतात किती 200 महिन्याला 6000 रूपये देखिल मिळत नाहीत. घरी किती देणार? मुलांचा शिक्षणाचा खर्च, घरचा खर्च कसा काढणार आमच्यावर भीक मागण्याची वेळ येऊ नये एवढं मात्र सरकारने करावं एवढीच अपेक्षा".

लक्ष्मण खावडे म्हणाले की, "गेले वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या. स्कूल बसेस देखिल बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्याने स्कूल बसेस चालू झाल्या असून शुल्कामध्ये देखिल वाढ करण्यात आली आहे. शालेय साहित्य शुल्कामध्ये देखिल वाढ करण्यात आली असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आमच्यासमोर आहे. कसा करणार शिक्षणाचा खर्च" असा प्रश्न समोर निर्माण झाला आहे.

हेही वाचा- Beed : साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ कुठंय माहिती आहे का?; जिथं 'विक्रमादित्य राजाला चालवावा लागला अडीच वर्षे तेलाचा घाणा'

 दरम्यान, काही रिक्षाचालक महाराष्ट्रातील असून अनेक रिक्षाचालक उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान या भागातून देखिल पैसे कमविण्यासाठी आलेले आहेत. मात्र, त्यांना घरी परतण्याशिवाय मार्ग नाही. पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर महागल्याने रिक्षा चालकांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी समस्या येत आहेत. रिक्षा घेतली याचा अर्थ सर्व काही घेतल असा होत नाही. रिक्षाच्या कर्जाचे हफ्ते भरावे लागतात. कर्जाच्या हफ्त्या पेक्षा गॅसचे दर अधिक अशी स्थिती सध्या रिक्षावाल्यांची आहे. 

First published:

Tags: Inflation, Mumbai