Home /News /maharashtra /

नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर धुळ्यात दोन गटांत जोरदार राडा, मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप

नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर धुळ्यात दोन गटांत जोरदार राडा, मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप

धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटांत वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याच दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असून मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

धुळे, 20 जानेवारी : राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल (Nagar Panchayat Election Result) काल जाहीर झाले. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच ठिकठिकाणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याच दरम्यान धुळ्यातील साक्री येथे दोन गटांत जोरदार राडा (clash between two groups in Sakri Dhule) झाला. जल्लोष सुरू असताना दोन गटांत किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याच दरम्यान एका महिलेचा मृत्यू (Woman died) झाला. मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुरू केला. याच वेळी त्या परिसरातून शिवसेनेचे कार्यकर्ते बाईकने जात होते. त्या दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. वाचा : शिवसेनेनं तिकीट दिलं अन् पारधी समाजाच्या तरुणाने केलं प्रस्थापितांना पराभूत हा वाद इतका वाढला की नंतर दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाली. हा वाद सोडवण्यासाठी अनेकांनी मध्यस्थी करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते गोटू जगताप यांच्या बहीण मोहिनी जाधव या सुद्धा वाद सोडवण्यासाठी तेथे आल्या. मोहिनी जाधव या वाद सोडवत असतानाच त्या अचानक खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहिनी जाधव यांचा मृत्यू भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हा आरोप होत असला तरी, मोहिनी जाधव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. मोहिनी जाधव यांच्या मृत्यू नंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा : रोहित पाटलांसाठी रोहित पवारांची 'बॅटिंग', शरद पवारांकडे केली मोठी मागणी! साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल एकूण जागा- 17 भाजप - 11 जागांवर विजयी शिवसेना - 04 जागांवर विजयी काँग्रेस - 01 जागेवर विजय राष्ट्रवादी - 00 अपक्ष - एका जागेवर विजय 'लोकसभेत भाजपची ताकद दिसेल' -चंद्रकांत पाटील 'नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं, आम्हीच नंबर एकचा पक्ष आहोत. निवडणूक लढवताना हे तीनही पक्ष वेगवेगळे लढतात आणि निकाल आल्यावर एकत्र येतात. या आकड्यांनी विधानसभा लोकसभेच चित्र बदलणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद दिसेल, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Dhule, Election, Shiv sena

पुढील बातम्या