'या निवडणूक लढवताना हे तीनही पक्ष वेगवेगळे लढतात आणि निकाल आल्यावर एकत्र येतात. आम्ही ज्या आमच्या जागेचा दावा केलाय तो आमच्या चिन्हावर जे निवडून आले आहेत त्यांचा आहे. एवढंच नाहीतर ज्यांना आम्हाला पाठिंबा दिला त्यांचाही त्यात समावेश आहे. पण या आकड्यांनी विधानसभा लोकसभेच चित्र बदलणार नाही.लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद दिसेल. त्यावेळी योजना आणि मोदींचा चेहरा सर्वकाही ठरेल, असंही पाटील म्हणाले. 'राष्ट्रवादी हा सगळ्यात हुशार पक्ष आहे. राष्ट्रवादी मुख्यमंत्री पद दुसऱ्याला देते पण महत्वाची खाती स्वतःकडे ठेवते. एकत्र येऊन जर हे निवडणूक लढले असते तर कार्यकर्ते एकमेकांच्या छाताडावर बसले असते, अशी टीकाही पाटील यांनी केली. 'आजच्या निकालांतून मतदारांनी चपराक दिली, तरी भाजपालाच कसा फटका बसलाय म्हणून महाविकास आघाडीचे काही बोलभांड गळे काढू लागलेत. महाविकास आघाडीनं वेगवेगळं लढूनही ९७६ जागा जिंकल्या, भाजपा तर ४००+च आहे वगैरे हाकाटी सुरू झाली आहे. आघाडी करू नका, असं तुम्हाला आम्ही सांगितलं होतं? असा सवालही पाटील यांनी केला. 'प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला, मग जागाही एकेकट्याच मोजा. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या, हे धडधडीत सत्य. पण ते नाकारण्यासाठी तीन पक्षांची बेरीज? वा रे महाविकास आघाडी.. मुळात हे कबूल करा की, नगर पंचायत, जि.प. निवडणुकीत जागावाटपावरून तंटा नको म्हणून तुम्ही वेगवेगळं लढलात, असा सवालही पाटील यांनी महाविकास आघाडीला केला. 'भाजपा या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून समोर आलाय. मला वाटतं, हे सत्य सगळ्याच पक्षांनी स्वीकारावं. दुसऱ्याचा विजय स्वीकारून त्याचं अभिनंदन केल्यानं आपल्यालाही मोठेपणाच मिळतो. ते जमत नसेल, तर आपण किती खुजे आहोत, याचं प्रदर्शन तरी मविआतल्या नेत्यांनी टाळावं, असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला. तसंच, विधानसभेतील भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपा आमदारांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपा आमदारांचे जाणीवपूर्वक निलंबन केल्यामुळे आता मविआ सरकारचीच गोची झाली आहे. याशिवाय न्यायमूर्ती सी टी रवीकुमार जी यांनीही प्रश्न उपस्थित केला की, एकाचवेळी १५-२० आमदार निलंबित झाले तर लोकशाहीचे भवितव्य काय असेल ? त्यामुळे हम करे सो कायद्याचा बडगा उगारून प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचा कारभार चालवता येणार नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.आजच्या निकालांतून मतदारांनी चपराक दिली, तरी भाजपालाच कसा फटका बसलाय म्हणून महाविकास आघाडीचे काही बोलभांड गळे काढू लागलेत. महाविकास आघाडीनं वेगवेगळं लढूनही ९७६ जागा जिंकल्या, भाजपा तर ४००+च आहे वगैरे हाकाटी सुरू झाली आहे. आघाडी करू नका, असं तुम्हाला आम्ही सांगितलं होतं?
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 19, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, चंद्रकांत पाटील