Home /News /maharashtra /

शिवसेनेनं तिकीट दिलं अन् पारधी समाजाच्या तरुणाने केलं प्रस्थापितांना पराभूत

शिवसेनेनं तिकीट दिलं अन् पारधी समाजाच्या तरुणाने केलं प्रस्थापितांना पराभूत

त्याच्या विरोधात असलेल्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना त्याने चित केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला.

  यवतमाळ, 19 जानेवारी : नगरपंचायत (Nagar Panchayat election 2022)  आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे (Zilla Parishad elections 2022) निकाल जाहीर झाले आहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लढत पाहण्यात आली. पण एकेकाळी शासन दरबारी लुटारू म्हणून ओळख असलेल्या पारधी (pardhi) समाजाच्या मुलाने कळंब नगर पंचायत निवडणुकीत (Kalamb Nagar Panchayat Election) प्रस्थापितांना धक्का देत विजय संपादन केला आहे. त्याच्या या विजयाने संपूर्ण पारधी बेड्यावरच जल्लोष साजरा करण्यात आला. कळंब शहराला लागून असलेल्या माथा वस्तीत राहणारा विजय चव्हाण या पारधी समाजातील 22 वर्षीय तरुणाने नगर पंचायत निवडणुकीत आपले नामांकन दाखल केले होते. विजय हा पारधी समाजातून आल्यामुळे फारसं त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. पण विजयने हळूहळू प्रचारात आघाडी घेतली आणि निवडणूक निकालाच्या दिवशी सर्वांचं धक्का दिला. (किंग कोहलीने कॅप्टन्सी जाताच मोडला सचिनचा 'महारेकॉर्ड', पॉण्टिंगही पडला मागे) विजय हा शिवसेनेच्या तिकीटावर मैदानात उतरला होता. आज निकालाअंती विजयने विजय मिळवला. त्याच्या विरोधात असलेल्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना त्याने चित केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला. विजयला 21 मतं मिळाली होती. विजय चव्हाणाच्या विजयाने पारधी वस्तीत गुलाल उधळला गेला. सर्वांनी नाचत गाजत विजय उत्सव साजरा केला. 'मी 21 मतांनी निवडून आलो. गावातील जुन्या लोक हे फार लक्ष देत नाही. जुने उमेदवार होते, त्यांनी काही संधी दिली नाही. पण गावातील काही जणांनी मला प्रोत्साहन दिले आणि निवडणुकीला उभं राहण्यास सांगितलं. सुदैवाने मी जिंकून आलो, त्यामुळे पुढे चालून गावातील लोकांसाठी काम करणार आहे, असं विजयने विश्वासाने सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Yavatmal

पुढील बातम्या